कोपरगाव तालुका
कोपरगावात विविध विकास कामांचे उदघाटन कार्यक्रम
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रं.पाच मधील सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत जवाहर मेडिकल ते भारत प्रेस रोड या ९.९९ लाख रुपये किमतीच्या रस्त्यांसह विविध चार विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्ताने रविवार दि.२३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती त्या प्रभागातील मावळते नगरसेवक योगेश बागुल यांनी दिली आहे.
स्व.बाळासाहेब ठाकरेंनी जून १९ इ.स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली.ठाकरेंच्या मते,’समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे पण मराठी माणूस मागेच राहिला आहे.महाराष्ट्रात सुविधा आहेत,पण मराठी माणूस द्विविधेत आहे.महाराष्ट्रात उद्योग आहेत,पण मराठी तरुण बेरोजगार तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे.महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच प्रामुख्याने मुंबईत अपमानित होतो आहे.त्यामुळे त्यांनी दुःखी होऊन शिवसेनेची स्थापना केली होती.त्यांचा जयंती रविवारी साजरी होत आहे.
शिवसेनेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दि.२३ जानेवारी रोजी जयंती उत्सव आहे.त्या निमित्त कोपरगाव नगर परिषद हद्दीत विविध विकास कामांचे उदघाटन आयोजित केले आहे.त्यात जवाहर मेडीकल ते भारत प्रेस रोड या रस्त्यांसह दलितेर योजनेतून प्रशांत चव्हाण घर ते गोकुळ शेठ गंगवाल या ०९.९९ लाख,नागरपरिषद फंड यातून महावीर भवन मंदिर परिसर रक्कम ९.९७ लाख,अजित कुलकर्णी ते विनोद डागा घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे आदीं चार कामांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन संत ज्ञानेश्वर माउली व्यापारी संकुल छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होणार आहे.तरी या परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई यांनी केले आहे.
जाहिरात पुरस्कृत….