कृषी विभाग
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवा-कृषी अधिकारी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत,असे आवाहन कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोंनवणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

“या पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनी प्रतिअर्ज ४० रुपये देणार आहे.मात्र काही सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे वसूल करत असल्याच्या बातम्या आहेत हि गंभीर बाब आहे.या केंद्र चालकांनी केवळ एक रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास पीक विमा कंपनी कार्यालय,तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी याना कळवावे”-मनोज सोनवणे,कृषी अधिकारी,कोपरगाव तालुका.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने सर्वसमावेशक ‘पीक विमा’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार शेतकरी हिस्याची रक्कम राज्य सरकार भरणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पी.एम.एफ.बी.वाय.(PMFBY) या पोर्टलवर सहभाग नोंदवता येणार आहे.खरीप हंगामातील भात,ज्वारी,बाजरी,नाचणी,मूग,उडीद,तूर,मका,भुईमूग,कारळे,तीळ,सोयाबीन,कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण १४ अधिसूचित पिकांसाठी,अधिसूचित महसूल,मंडळ,क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. सन-२०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.त्यानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे.त्यामुळं शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन http://pmfby.gov.in या पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे.कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छूक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहे.
दरम्यान अ.नगर जिल्ह्यासह नाशिक,सोलापूर,जळगाव,आदी जिल्ह्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,निर्धारित करण्यात आली आहे.या पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनी प्रतिअर्ज ४० रुपये देणार आहे.मात्र काही सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे वसूल करत असल्याच्या बातम्या आहेत हि गंभीर बाब आहे.या केंद्र चालकांनी केवळ एक रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास पीक विमा कंपनी कार्यालय,तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी,जिल्हाधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी,जिल्हा कृषी अधीक्षक आदिकडे तक्रारी कराव्या असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांचेसह तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांनी शेवटी केले आहे.



