कोपरगाव तालुका
महात्मा फुले कर्जमुक्ती योजना पूर्ण यशस्वी करा-तहसिलदार चंद्रे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्जबाजारी शेतकऱ्यांना वरदान ठरणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आपले सरकार सेवा केंद्र,सुविधा केंद्र, बँक,विकास सेवा संस्था आणि लाभार्थी शेतकरी यांनी समन्वयाने आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन पूर्णपणे यशस्वी करा.असे आवाहन कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
दि.३० सप्टेंबर २०१९ पुर्वी थकित असलेले सुमारे २ लक्ष रुपये पर्यंतचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी बँकाकडून प्रमाणित केलेल्या याद्या वेबपोर्टलवर दिसल्यावर त्याची प्रिंट काढून सेवा केंद्र किंवा बँक नोटीस बोर्डवर प्रसिध्द कराव्यात. प्रसिद्ध यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी आपापल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र,सुविधा केंद्र यांचेशी संपर्क साधावा-तहसीलदार योगेश चंन्द्रे
कोपरगांव तहसिल कार्यालयात आपले सरकार सेवा केंद्र,सुविधा केंद्र, बँक,विकास सेवा संस्था यांची बैठक आणि प्रशिक्षण नुकतेच मोठया उत्साहात संपन्न झाले.त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तहसील कार्यालयाचे तुरुंग अधिकारी रविंद्र देशमुख, विस्तार अधिकारी सुनील माळी यांचेसह सर्व सुविधा केंद्राचे चालक उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ प्रभावीपणे अंमलबजावणी करिता मार्गदर्शन करणारी तयार केलेली चित्रफित दाखविण्यात आली.
३० सप्टेंबर २०१९ पुर्वी थकित असलेले सुमारे २ लक्ष रुपये पर्यंतचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी बँकाकडून प्रमाणित केलेल्या याद्या वेबपोर्टलवर दिसल्यावर त्याची प्रिंट काढून सेवा केंद्र किंवा बँक नोटीस बोर्डवर प्रसिध्द कराव्यात. प्रसिद्ध यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी आपापल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र,सुविधा केंद्र यांचेशी संपर्क साधावा. या योजनेकरिता संबंधित शेतकऱ्यांकडून कुठलेही शुल्क आकारु नये.अशी सुचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.