जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महावितरणचा गलथान कारभार,आंदोलनाचा इशारा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात महावितरण कंपनीचा मोठ्या प्रमाणावर गलथान कारभार सुरु असून त्यांचा भुर्दंड विज ग्राहकाना सोसावा लागत असून महावितरण कंपनीने आपल्या कारभारात सुधारणा केली नाही तर आपण त्या विरोधात आंदोलन करू असा इशारा अण्णाभाऊ साठे माल वाहतूक असोसिएशनने नुकताच कोपरगाव येथील महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांना दिला आहे.

वर्तमानात कोपरगाव शहर व तालुक्यात वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल देण्याचे प्रताप महावितरण कंपनीने सुरु केले असून एखादे बिल थकले तर त्याची वीज जोडणी लगेच खंडित करण्याचे प्रताप सुरु आहे. ग्राहकांना कुठलीही पूर्व सूचना न देता वीज जोडण्या खंडित करण्याचे काम सुरु आहे.कोपरगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना काही लाखात बिले देण्याचे धाडस महावितरणचे अधिकारी करत असून त्यांना लोक न्यायालयाचा धाक दाखवून पठाणी वसुली सुरु आहे-संदीप निरभवणे

वर्तमानात कोपरगाव शहर व तालुक्यात वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल देण्याचे प्रताप महावितरण कंपनीने सुरु केले असून एखादे बिल थकले तर त्याची वीज जोडणी लगेच खंडित करण्याचे प्रताप सुरु आहे. ग्राहकांना कुठलीही पूर्व सूचना न देता वीज जोडण्या खंडित करण्याचे काम सुरु आहे.कोपरगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना काही लाखात बिले देण्याचे धाडस महावितरणचे अधिकारी करत असून त्यांना लोक न्यायालयाचा धाक दाखवून पठाणी वसुली सुरु आहे.ऑनलाइन बिले भरलेली असताना सुद्धा त्यांची खातरजमा न करता त्यांच्या वीज जोडण्या खंडित करण्याचे काम तातडीने केले जात आहे.शिवाय पुन्हा वीज जोडण्याची आकारणी करण्यास हा विभाग धजावतो त्यामुळे नागरिक संतापले आहेत.अनेक ठिकाणी वीज चोऱ्या होत असताना त्यांचेकडे दुर्लक्ष करून त्यांच्याकडून चिरीमिरी करण्याचे पातक हि मंडळी करत आहे.या बाबत तक्रारी करण्यास ग्राहक गेले असता त्यांना उद्धटपणे उत्तरे दिली जातात.या कारभारात महावितरणने सुधारणा केली नाही तर महावितरण कंपनी विरोधात आंदोलन छेडले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी माहावितारांची राहील असा इशारा अण्णाभाऊ साठे माल वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संदीप निरभवणे यांनी दिला आहे.निवेदनावर सचिन त्रिभुवन, राहुल बागुल, जालिंदर पवार, संजय खरात, बाळासाहेब पवार, निसार सय्यद, संतोष निरभवणे आदींसह सतरा कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close