कोपरगाव तालुका
महा.एन.जी.ओ.फेडरेशन,सामाजिक संस्थांना प्रभावी बनवणार-आश्वासन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रामध्ये दोन हजार सामाजिक संस्थांची महा.एन.जी. ओ.फेडरेशन शिखर संस्था असून सर्व प्रकारची विविध माहिती,शासकीय योजना व विविध उपक्रम राबविण्याचे राज्यातील संस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम फेडरेशन करत असल्याचे प्रतिपादन नूतन कार्यकारी संचालक अक्षय महाराज यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व संस्थांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे.त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक संस्थांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली त्यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे होते.
बसदर प्रसंगी अक्षय महाराज,ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे,सुनील साळवे आदींसह इंडियन रेड क्रॉस चे प्रवीण साळवे,आनिसचे पोपटराव शेळके,मानवी कल्याण सेवाभावी संस्थांचे भरत कुंकूलोळ,युवक बिरादरीचे सागर गिरनारे,कनोसा कॉन्व्हेन्ट पाकुली लोपिस,ग्रेसी,गरीब नवाज फाऊंडेशनचे नगरसेवक मुख्तारभाई शहा,अकबर पठाण,अपंग सामाजिक संस्थांचे संजय साळवे,इनरव्हील क्लबचे ममता गुप्ता,शान देशमुख,माऊली वृद्धाश्रमचे सुभाष वाघुंडे,एकलव्य सेवा संघाचे भाऊराव माळी, सोसायटी ऑफ हेल्पर्स ऑफ मेरी चे सी.श्र्वेता,कल्पना माघाडे, अशांकुर चॅरिटेबल ट्रस्ट भोकरचे सी.प्रिस्का,कल्पना कोळगे,सोशल सर्व्हिस फाऊंडेशनचे सूरज सुर्यवंशी,संचित आदिक,स्व.विलासराव पंडित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थाचे वैभव पंडित,गर्भगिरी बहुउद्देशीय संस्था वांबोरीचे ,शिवाजी पुंड,सोशल वधू वर केंद्राचे तुकाराम शिंदे आदी संस्था पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”प्रत्येक संस्था आर्थिकदृष्ट्या सबळ असेल तरच समाजसेवा होऊ शकते तेव्हा सर्व संस्थांनी प्रथम स्वतः काम दाखवावे महा.एन.जी.ओ.अशा कामाच्या संस्थांना सर्व प्रकारची मदत करेल,त्यासाठी प्रथम संस्थांनी महा.एन.जी.ओ.चे अधिकृत आजीव सभासद व्हावे असे आवाहन करतानाच सर्व सामाजिक संस्थांना प्रभावीपणे सक्षम करणे हाच महा.एन.जी.ओ.फेडरेशन संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन नूतन कार्यकारी संचालक अक्षय महाराज यांनी शेवटी म्हटले आहे.
सदर प्रसंगी जिल्ह्याचे समन्वयक सुनील साळवे यांनी प्रास्तविक केले.त्यामध्ये जिल्ह्यातील संस्थांची माहिती विशद केली
त्यानंतर प्रत्येक संस्था प्रतिनिधींनी आपल्या संस्थेबद्दल माहिती विशद करून विविध समस्यांवर चर्चा केली व चर्चेत सहभाग घेतला,ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी उत्तम काम करणाऱ्या संस्थांना शाबासकी देऊन कौतुक केले.
उपस्थितांचे शेवटी प्रवीण साळवे यांनी आभार मानले.