कोपरगाव तालुका
राष्ट्रसंत वर्धमान सागर महाराज यांचे कोपरगावात आगमन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
चारित्र चक्रवर्ती आचार्य १०८ शांतीसागर महाराज यांच्या परंपरेचे पंचम पट्टाधिश राष्ट्रसंत वर्धमान सागर महाराज यांच्या संघाचे कोपरगाव येथे एस.जी.विद्यालयात नुकतेच आगमन झाले आहे.
परमानंद सागर महाराज यांचे यमसल्लेखना वृत्तधारण १३ जानेवारी पासून केले असून आहार त्याग देखील केला आहे. या त्यागाला जैन समाजात व जैन धार्मिक संस्कृतीत असाधारण असे महत्व मानले जाते अशा प्रकारचा कार्यक्रम हा कोपरगाव शहरात पहिल्यांदाच घडत असल्याने कोपरगाव करांचे औत्सुक्य वाढले आहे.
या संघातील मुनि १०८ परमानंद सागर महाराज यांचे यमसल्लेखना वृत्तधारण १३ जानेवारी पासून केले असून आहार त्याग देखील केला आहे. या त्यागाला जैन समाजात व जैन धार्मिक संस्कृतीत असाधारण असे महत्व मानले जाते अशा प्रकारचा कार्यक्रम हा कोपरगाव शहरात पहिल्यांदाच घडत असल्याने हा मोठा धार्मिक योगायोग मानला जात आहे. कोपरगाव शहरात जैन समाज देखील मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे त्याचा दर्शनासाठी श्रीरामपूर,औरंगाबाद,वैजापूर,नाशिक,नांदगावसह परीसरातुन मोठ्या प्रमाणावर जैन भाविक येत आहे. या संघात जवळपास १२ मुनी १६ माताजी सह १२० भाविक त्यांच्या सेवेसाठी योगदान देत आहे.कोरोना नियमाचे पालन करत या ठिकाणी जैन मुनी व भाविक याची काळजी घेतली जात असल्याची माहिती आहे. परमानंद महाराज हे कोल्हापूर जिल्ह्यातील अल्लारी या गावातील जैन भाविक असुन १३ ऑगस्ट २०२१ रोजी कोथली कर्नाटक येथे वर्धमानसागर महाराज यांनी त्यांना दीक्षा दिली होती. त्याचा धार्मिक मोठा अभ्यास होता. कर्नाटक येथुन निघालेला या वर्धमान महाराज यांचा संघ चातुर्मास संपुर्ण पायी चालत महाराष्ट्र मधुन राजस्थान महाविरजीकडे पायी निघालेला असताना कोपरगाव येथे असताना परमानंद सागर महाराज यांनी आहार त्याग व यम सल्लेखना वृत्त धारण केल्याची माहिती कोपरगाव दिगंबर जैन समाजातील पंच प्रविण गंगवाल.विजय पहाडे राजेंद्र गंगवाल यांनी दिली आहे.