जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दिव्यांग लाभार्थ्यांना मनसेच्या वतीने विविध योजनांचा लाभ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कार्य मनसेचे ‌नुकतेच रोजी महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगाव तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय अन्न सुरक्षा व दिव्यांग लाभार्थी रेशन कार्ड वाटप तसेच रेल्वे पास चे वाटप करण्यात आले आहे.

विकलांग, अपंग व्यक्तीमधे एक अतिरिक्त, अनाकलनीय शक्ती असते म्हणुन त्यांना अपंग न म्हणता दिव्यांग म्हणावे, असे आमचे (भारताचे) पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं सांगितले. तेंव्हापासुन या दिव्यांगाकडे व त्यांच्या प्रश्नाकडे सरकार व समाजाचे विशेष लक्ष वेधले गेले. अनेक सोयी सुविधा – ज्यांच्याशिवाय दिव्यांगांना घराबाहेर पडणे अशक्य होते – त्यांच्या निर्मितीस गती मिळाली. सरकारी सूत्रे हलू लागली आहे.कोपरगावमनसेने त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या प्रयत्नातून उत्तर अहमदनगर जिल्ह्याचे मनसे उपजिल्हा अध्यक्ष संतोष गंगवाल यांच्या शुभहस्ते तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त कोपरगाव तालुक्यातील जवळपास ४० दिव्यांगांना अंतोदय रेशन कार्ड २० दिव्यांगांना अन्नसुरक्षा रेशन कार्ड ४० दिव्यांगांना दिव्यांग लाभार्थी रेशन कार्ड तसेच पाच दिव्यांगांना रेल्वे कन्सेशन पास वाटप करण्यात आले दिव्यांग बंधू-भगिनींना वरील रेशन कार्ड मिळण्यासाठी तहसीलदार विजय बोरुडे,मंडल अधिकारी तथा पुरवठा विभागाचे श्री भिंगार दिवे,श्री बिनोड,नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी,श्री गायकवाड,श्री रवि काळणे श्री प्रवीण काजळे यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेनेच्या वतीने तसेच कोपरगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.

सदर या प्रसंगी रोशन खकाळे यांची मनसे दिव्यांग सेना अहमदनगर उत्तर उपजिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब पारखे यांची कोपरगाव तालुका अध्यक्षपदी तर अर्चनाताई बनकर यांची कोपरगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे.

या प्रसंगी मनसे दिव्यांग सेना तालुका संघटक संजय गीते महिला शहराध्यक्ष संगीता रावळ,अनिल गिड्डे,अनिल भाऊ वाणी, गणेश गायकवाड,गौरव आमले,अमोल डांगे, योगेश खरोटे आदी मान्यवरांसह लाभार्थी दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी आपणास दिव्यांग लाभार्थी योजने अंतर्गत अंत्योदय व अन्नसुरक्षा रेशन कार्ड मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे तसेच अनिल गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या तसेच नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close