जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

“आवाज का दिला” म्हणत मारहाण,कोपरगावात चार जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतल्याजावळ असलेल्या ‘हॉटेल सुरभी’ या हॉटेलच्या पार्किंगमध्ये भ्रमणध्वनीवर बोलत असताना आरोपी दादू आवारे हा फिर्यादी जवळ आला व त्याने,”तू,आम्ही बसलेल्या टेबलवर असताना आवाज का दिला ? अशी विचारणा करून आपल्याला शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली तर दुसरा आरोपी सोनू यादव याने लोखंडी रॉडने आपल्याला मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद चालक वैभव परशराम गीते (वय-२५) रा.कोपरगाव बेट यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी व साक्षिदार प्रफुल्ल शिंगाडे हे त्या ‘हॉटेल सुरभी’च्या पार्किंग मध्ये आपल्या भ्रमणध्वनीवर बोलत असताना त्या ठिकाणी आरोपी दादू आवारे हा त्या ठिकाणी आला व त्याने फिर्यादी वैभव गीते यास म्हणाला की,”तू,आम्ही बसलेल्या टेबलवर असताना आवाज का दिला ? अशी विचारणा करून आपल्याला शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.तर आरोपी सोनू यादव याने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर मारहाण केली व त्यास जखमी केले आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,फिर्यादी हा कोपरगाव बेट शुक्लेश्वर मंदिर परिसरात राहणारा असून तो वाहन चालक म्हणून व्यवसाय करतो.तर आरोपी हे कोपरगाव शहरातील रहिवासी आहे.दि.१९ एप्रिल रोजी फिर्यादी वैभव गीते व त्याचे साथीदार प्रफुल्ल शिंगाडे हे ‘हॉटेल सुरभी’ येथे जेवणासाठी गेले असता.जेवण संपल्यावर फीर्यादी व साक्षिदार प्रफुल्ल शिंगाडे हे त्या हॉटेलच्या पार्किंग मध्ये आपल्या भ्रमणध्वनीवर बोलत असताना त्या ठिकाणी आरोपी दादू आवारे हा त्या ठिकाणी आला व त्याने फिर्यादी वैभव गीते यास म्हणाला की,”तू,आम्ही बसलेल्या टेबलवर असताना आवाज का दिला ? अशी विचारणा करून आपल्याला शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.

दरम्यान या घटनेत आरोपी सोनू यादव याने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर मारहाण केली व त्यास जखमी केले आहे.या मारहाणीत आरोपी म्हणून दीपक नायकोडे,अभिजित शिंदे आदींचा समावेश आहे.त्या बाबत फिर्यादि चालक वैभव परशराम गीते रा.कोपरगाव बेट यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

सदर प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.९४/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close