कोपरगाव तालुकाजयंती,पुण्यतिथी अभिवादन
वर्तमानात राजकीय व्यवस्थेने पत्रकारितेला पोखरले-माजी अध्यक्ष यांची टीका
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीत अत्यंत कमी वयात मराठी व इंग्रजीत वर्तमान पत्र काढून ज्यांनी समाज प्रबोधन केले ते बाळशास्त्री बाळ जांभेकर यांनी अत्यन्त चांगले काम केले असू वर्तमानात राजकीय व्यवस्थेने पत्रकारितेला पोखरले असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
विश्वविख्यात माध्यमतज्ज्ञ ए.ए. बेर्जर यांनी म्हटले आहे की, वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारधारानुसार जवळपास 183 वर्षापूर्वी म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो.
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे हे होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,माझी बातमी आली तर पत्रकार चांगला,नाही तर वाईट असा सोपा अर्थ काही मंडळी काढत असेल तर ते चुकीचे आहे.
“माईक समोर आला की आम्ही मारतो टापा, तुम्ही त्या पहिल्या पानावर छापा”
या चारोळ्या सांगून वर्तमान काळातील आरसा दाखवला असून आगामी काळात तुम्हाला भरपूर बातम्या मिळतील असे सूतोवाच केले व प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व पत्रकारांचे मनोधर्य खच्ची करणार असाल तर आपण प्रामाणिक अधिकारी व पत्रकारांच्या पाठीशी उभे राहू असा इशारा दिला आहे.व राजकीय नेत्यांना कोणी मोठे केले आहे.ज्यांनी तुम्हाला मोठे केले तर त्यांना बटीक बनवण्याचे पातक करू नका असा इशारा राजकीय नेत्यांना दिला असून विरोधात असले तरी ते आरशासारखे स्वीकारले पाहिजे.व स्वतःत सुधारणा करायला हवी.व पत्रकारांनी आपण कोणाची बातमी छापतो याचे भान ठेवायला हवे.व कोणाला डोक्यावर घेतो याचे भान ठेवायला हवे.व सन्मान चिन्ह हे कशाला दिले याचे भान ठेवा असे आवाहन केले आहे.व पत्रकारांशी वादावादी परवडू शकत नाही अशा अर्थाच्या चारोळ्या शेवटी ऐकवल्या आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला तर थोरे यांनी कोपरगावातील पत्रकारांच्या योगदानाचा उल्लेख केला आहे.तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचीन सुर्यवंशी यांनी कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे आज हरवलेले ९३ अतिक्रमण हटवले याची माहिती सांगीतली आहे.व यात पत्रकारांनी सर्व बाजूंनी त्याचे वृत्तांकन कसे दाखवले याची माहिती दिली आहे.व सर्व बाजू दाखविण्याचे काम निपक्ष पत्रकार करत असल्याचे एका वृत्तवाहिनीने उदाहरण देऊन सांगितले आहे.व वर्तमान पत्र व वृत्त वाहिन्यांमधील फरक दाखवून दिला आहे.
सदर कार्यक्रमास,लायन्स कॅलबचे अध्यक्ष राम थोरे,कोपरगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा,आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी उपस्थित पत्रकारांचा सत्कार माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन लायन्सचे अध्यक्ष राम थोरे,सत्येन मुंदडा,पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे,प्रा.साहेबराव दवंगे,आदींनी केले तर सूत्रसंचलन महारुद्र गालट यांनी तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर चाकने यांनी मानले आहे.