जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

टाकळीत आढळला मृत बिबट्या,वनविभागाने घेतली दखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकली ग्रामपंचायत हद्दीत भोंगळे वस्ती येथिल विहिरीत एक अल्पवयीन बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने टाकळी परिसरात खळबळ उडाली आहे.या बाबत कोपरगाव वनक्षेत्रपाल संतोष जाधव यांनी दखल घेऊन घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून या बिबट्याच्या मृत्यूचे कारण शोधले जात आहे.

दरम्यान टाकळी भागात वर्तमानात रब्बी पिकांना पाणी भरण्याची कामे सुरु असून रब्बी पिकांची मोठी वाढ असल्याने त्यात बिबट्या असल्याच्या भीतीने गाळण उडाली आहे.त्यातच महावितरण शेतकऱ्यांना रात्रीच विज पुरवठा करत असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

टाकळी गावातील काही शेतकऱ्यांना आपल्या शेतात गेल्यावर आपल्या विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत तरंगत असल्याचे दिसले त्यांनी या बाबत कोपरगाव वनविभागात अधिकाऱ्यांना या बाबत सूचित केल्यावर घटनास्थळी कोपरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांचे मार्गदर्शनाखाली,वनरक्षक रामकृष्ण सांगळे, हरितसेना सदस्य सुशांत घोडके, वनविभागाचे भाऊसाहेब कुळधरण, वन कर्मचारी देवराम जाधव,प्रताप दवंगे, संजय गोसावी,लक्ष्मण थोरात यांनी प्रत्यक्ष ताब्यात घेवून लघु पशुचिकित्सालय,कोपरगांव येथे दाखल.पशुधनविकास अधिकारी डॉ.दिलीप दहे,पशुधनविकास अधिकारी डॉ.श्रध्दा काटे यांचे कडून अंतीम शव विच्छेदन करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close