कोपरगाव तालुका
सावित्रीबाई यांचे कार्य वर्तमान काळातही प्रेरणादायी-प्राचार्य डॉ.थोपटे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.त्यांची जयंती कोपरगाव येथे श्री गंगागिरी महाराज महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील प्रसिध्द उद्योगपती सुनील दत्तात्रय जगताप हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. सूत्रसंचलन प्रा.छाया शिंदे यांनी केले.तर आभार डॉ.सुरेश काळे यांनी मानले.