जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सावित्रीबाई यांचे कार्य वर्तमान काळातही प्रेरणादायी-प्राचार्य डॉ.थोपटे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सावित्रीबाई व ज्योतिबा यांचे कार्य व विचार आजच्या काळातही अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.

सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.त्यांची जयंती कोपरगाव येथे श्री गंगागिरी महाराज महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील प्रसिध्द उद्योगपती सुनील दत्तात्रय जगताप हे होते.

सदर कार्यक्रमास संगीता मालकर,उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर,डॉ.व्ही.बी.निकम, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.रामभाऊ गमे,कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,सावित्रीबाईंचा काळ सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत खडतर असूनही त्यांनी आपल्या पतीसमवेत परिस्थितीशी झुंज देत समाजकार्य केले.त्यांच्या कार्यातूनच अनेक पिढ्या घडल्या याचे भान आपण सर्वांनी ठेवायला हवे. सावित्रीबाई व ज्योतिबा यांचे कार्य व विचार आजच्या काळातही अत्यंत उदबोधक असून महापुरुषांच्या विचार कार्याचा जागर युवापिढीसाठी खूप महत्वाचा ठरणारा आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. सूत्रसंचलन प्रा.छाया शिंदे यांनी केले.तर आभार डॉ.सुरेश काळे यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close