जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्रियांवरील अत्याचार हा अक्षम्य गुन्हा-कोपरगावात जनजागृती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

स्त्री पुरुष समानता हा आपल्या घटनेने दिलेला हक्क आहे.त्यामुळे जर स्त्रियांना असमान वागणूक दिला जात असेल आणि त्याही पुढे जाऊन जर स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ वर्षानंतरही स्त्रियांवर अत्याचार होत असतील तर तो अक्षम्य गुन्हा असल्याचे प्रतिपादन पुणेस्थित डॉ.रेवती नाईक यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सामाजिक विषमता हि जात,धर्म आणि लिंग या तीन घटकावर आधारित आहे.पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे.स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपारिक,प्रतिगामी मानसिकता आहे.स्त्रियांना शिक्षण,सत्ता,संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आले होते.धार्मिक कायद्यांचा आधार घेवून स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादली गेली आहे.या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र महत्वपूर्ण मानले जात आहे.

सामाजिक विषमता हि जात,धर्म आणि लिंग या तीन घटकावर आधारित आहे.पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे.स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपारिक,प्रतिगामी मानसिकता आहे.स्त्रियांना शिक्षण,सत्ता,संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आले होते.धार्मिक कायद्यांचा आधार घेवून स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादली गेली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयातील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कक्ष व आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांवर होणारे अन्याय व त्यासंदर्भातील कायदे’ या विषयावर आयोजित एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली होती त्या वेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांची उपस्थिती होती.

सदर प्रसंगी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”महिला अत्याचार प्रतिबंध संदर्भातील २०१३ चा कायदा,२००५ चा संपत्ती मध्ये मुलींच्या हक्का संदर्भातील कायदा,लैंगिक छळवणुकीच्या संदर्भातील कायदा आदी.कायद्याची माहिती महिलांना होणे गरजेचे आहे.देखील उपस्थितांना दिली.या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.संतोष पगारे यांनी स्वागतपर भाषण केले.

सदर प्रसंगी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या प्रमुख डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी प्रास्ताविक केले.तर प्रा.वर्षा आहेर यांनी सूत्रसंचलन केले.ग्रंथपाल प्रा.नीता शिंदे यांनी आभार व्यक्त केले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,प्रा.एस.जी कोंडा,डॉ. आर.ए जाधव,प्रा.कोमल म्हस्के प्रा.वृषाली पेटकर आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close