जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावची ४९ कोटिंची पाणी योजना गेली पाण्यात-…या माजी नगराध्यक्षांचा आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेली ४९ कोटी रुपयांची पाणी योजना निधी संपुनही त्याचा फायदा नागरिकांना अद्याप मिळाला नाही.वितरण व्यवस्था दुरुस्त केली नाही त्यामुळे संपूर्ण निधी वाया गेल्याचा आरोप कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

“शहरातील निवडणूक कधी होईल हे अद्याप सांगता येणार नाही.इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचा तिढा जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत नवीन पदाधिकारी येणार नाही यात बराच वेळ जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे शहरातील विविध विकास कामे सत्वर मार्गी लावणे गरजेचे आहे.अन्यथा नागरिकांनी लाखो रुपयांचा कर भरूनही त्याचा योग्य उपयोग होणार नाही व शहराची नव्याने निर्मांण झालेली ‘धुळगाव’ व ‘सेवानिवृत्तांचे शहर’ हि ओळख पुसणे अवघड होईल”-मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा कालावधी नुकताच दि.२९ डिसेंबर रोजी संपला आहे.त्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.आता सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना आगामी नगरपरिषद निवडणुकीचे वेध लागले आहे.त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास प्रारंभ झाला आहे.या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आरोपांची पहिली तोफ डागली आहे.

त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,केंद्र सरकारने कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी सुमारे ४९ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली होती.यात शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणे अपेक्षित होते.मात्र झाले उलटेच पाणी योजनेचा निधी संपुनही या योजनेची मुख्य बोंब असलेली सदोष वितरण व्यवस्था ‘जैसे थे’च राहिली.वितरण व्यवस्थेची पूर्ण दाबाने तपासणी झाली नाही.त्यामुळे नागरिकांना आजही चार ते आठ दिवसांनी पाणी मिळत आहे.त्यामुळे हा निधी अक्षरशः वाया गेला असे म्हणण्यास जागा आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील जनतेला पुन्हा पाच क्रमांकाच्या तलावासाठी पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकावे लागले होते.आता पुन्हा या तलावाचे काम आ.आशुतोष काळे यांच्यामुळे प्रगती पथावर आहे हि समाधानाची बाब आहे.मात्र अद्याप निधी मिळणे व काम होण्यास गती मिळण्याची गरज आहे.अशातच वर्तमान नगरसेवक व पदाधिकारी यांची मुदत संपली आहे.शहरात विविध रस्त्यांची कामे निविदा जाहीर होऊन ते सुरु झाले आहे.त्यांच्या उदघाटनांचा धडाका नुकताच शेवटी-शेवटी संपन्न झाला आहे.हि समाधानाची बाब असली तरी आता पदाधिकारी यांची मुदत संपल्याने या कामावर कोणी देखरेख ठेवायची हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे मोठा निधी येऊनही तो गुणवत्ताहीन कामावर खर्च झाला तर,” ये रे माझ्या मागल्या…” अशी शहराची गत होणार आहे.त्यामुळे या कामावर लक्ष ठेवण्याची नितांत गरज आहे.

या निविदा वेळेत झाल्या असत्या तर काम या पदाधिकाऱ्यांच्या कालावधीत पूर्ण होऊन ते सुरळीत झाले असते.मात्र आता या कामांवर नियंत्रण ठेवण्याचा गंभीर प्रश्न निर्मांण झाला आहे.त्यामुळे प्रशासनाने या कामाच्या सुरुवातीस या कामाच्या माहितीचा फलक दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. व तशी निविदेत तरतूद असते.त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय कार्यकर्ते यांनी तसा आग्रह धरणे गरजेचे आहे.तरच हि सामान्य माहिती नागरिकांना मिळून त्या प्रमाणे काम होते की नाही याचा खुलासा नागरिकांना होईल.व या कामांची किती बिल निघाले ? व किती बाकी आहे? याची माहिती नगरपरिषदेने विनामूल्य देणे गरजेचे आहे.या प्रस्तावित कामांची गुणवत्ता टिकण्यास मदत होणार आहे.

शहरातील निवडणूक कधी होईल हे अद्याप सांगता येणार नाही.इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचा तिढा जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत नवीन पदाधिकारी येणार नाही यात बराच वेळ जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी लाखो रुपयांचा कर भरूनही त्याचा योग्य उपयोग होणार नाही व शहराची नव्याने निर्मांण झालेली ‘धुळगाव’ व ‘सेवानिवृत्तांचे शहर’ हि ओळख पुसणे अवघड होईल.शहरातील एक कोटी रुपयांचे खुल्या नाट्यगृह,विविध बागा,जेष्ठासांठी स्वतंत्र मार्गिका,आदी कामे सत्वर होणे गरजेचे आहे.शहरात माजी आजी लोकप्रतिनिधींनी निधी आणूनही उपयोग होणार नाही असा इशाराही माजी शहराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close