जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात निवडणूक अधिकारी म्हणून राहुल मुंडके,आचारसंहिता सुरु

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघांसह राज्यातील 288 जागांसाठी विधानसभेची निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल जाहीर केली असून कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी नियुक्ती जाहीर करण्यात अली असून सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे यांची नेमणूक करण्यात आली असून कालपासून आदर्श आचारसंहितेस प्रारंभ करण्यात आला असून शहर व तालुक्यातील राजकीय पक्षांचे फलक हटविण्यात आले असून जे हलविता येऊ शकत नाही ते झाकून टाकण्यात आले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत काल सांयकाळी तहसील कार्यालयात दिली आहे.

या निवडणुकीची अधिसूचना शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली असून नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर अशी राहणार आहे.आलेल्या अर्जाची छाननी शनिवार दि.5 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे.तर आलेले नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार दि.7 ऑक्टोबर अशी राहणार आहे.तर मतदान सोमवार दि.21 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे.मतमोजणी गुरुवार दि.24 ऑक्टोबर रोजी संपन्न होऊन त्याच ठिकाणी त्याच वेळी निकाल घोषित करण्यात येणार आहेत.

राज्यात 288 जागांसाठी तर हरियाणात 90 जागांसाठी निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.या निवडणुकीची अधिसूचना शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली असून नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर अशी राहणार आहे.आलेल्या अर्जाची छाननी शनिवार दि.5 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे.तर आलेले नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार दि.7 ऑक्टोबर अशी राहणार आहे.तर मतदान सोमवार दि.21 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे.मतमोजणी गुरुवार दि.24 ऑक्टोबर रोजी संपन्न होऊन त्याच ठिकाणी त्याच वेळी निकाल घोषित करण्यात येणार आहेत.

दरम्यान शिर्डी (राहाता) या ठिकाणी निवडणूक अधिकरी म्हणून उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांची निवड जाहीर झाली असून त्यांना सहाय्यक म्हणून राहाता येथील तहसीलदार कुंदन हिरे हे मदत करणार आहेत.

आदर्श आचार संहिता कालपासूनच सुरु करण्यात आली असून राजकीय पक्ष व त्यांचे पोस्टर कालच हटविले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी मुंडके यांनी दिली आहे.आचारसंहिते बाबत कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी निवडणूक आयोगाने एक ऍप विकसित केले असून सि. व्हि. जी.नावाच्या या ऍपवर जाऊन आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरिकांना व कार्यकर्त्यांना करता येणार आहे.तसेच विविध ठिकाणी तपासणीसाठी फिरती पथके नेमण्यात आली असून ते संशयित गाड्यांची चौकशी करून खात्री करतील.या बाबत नागरिकांनी व राजकीय पक्षांनी आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close