जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अवैध वाळू उपसा,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आरोपी संजय उर्फ विकी अशोक शिंदे (वय-२२)रा.चांदगव्हाण याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून एक विना क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (किंमत ३.१० लाख रुपये किमतीचा )जप्त केला आहे.त्यामुले अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यातून पूर्वमुखी वाहणाऱ्या गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली असतानाही काही वाळूचोर अधिक पैशाच्या हव्यासापायी अवैध वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे उघड झाले आहे.कोपरगाव तालुक्यात अवैध वाळूचोरीवरून अनेक खून झालेले आहे.तरीही वाळूचोरांचा हव्यास अद्याप कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव तालुक्यातून पूर्वमुखी वाहणाऱ्या गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली असतानाही काही वाळूचोर अधिक पैशाच्या हव्यासापायी अवैध वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे उघड झाले आहे.कोपरगाव तालुक्यात अवैध वाळूचोरीवरून अनेक खून झालेले आहे.तरीही वाळूचोरांचा हव्यास अद्याप कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण या हद्दीत घडली असून कोपरगाव शहर पोलिसांना या प्रकरणी एक वाळू ट्रॅक्टर अवैध वाळूचोरी करत सल्याची माहिती प्राप्त झाली होती.त्या सूचनेनुसार शहर पोलिसानी शनिवार दि.२० जून रोजी दुपारी २.४० वाजता छापा टाकला असता त्या ठिकाणी एक लाल रंगाचा विना क्रमांकाचा स्वराज-८५५ हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला.कोपरगाव शहर पोलिसानी या ट्रॅक्टरर्सला थांबण्याचे आवाहन केले असता ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी या ट्रॅक्टरला एक ब्रास वाळूसह जप्त करून त्या ट्रॅक्टरवर व चालकांवर फिर्यादी पो.कॉ.रामकृष्ण गोरख खारतोडे यांनी आपल्या दप्तरी गु.र.नं.२२३/२०२० भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ससाणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close