कोपरगाव तालुकाविशेष लेखमाला
कोपरगाव न.पा.ची निरोपाच्या सभेत निळवंडेचे महाभारत !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषदेची आज संपन्न झालेली निरोपाची सर्वसाधारण सभा अपेक्षेप्रमाणे वादळी संपन्न झाली असून त्यात अपेक्षे प्रमाणे आजही निळवंडे बंदिस्त जलवाहिनी आणि पाच क्रमांकाचा साठवण तलाव यांच्यावरच पिपाणी केंद्रित राहिली असून यात दोन्ही कडील आरक्षण कायम करावे असे दोन्ही डगरीवर हात ठेवण्याचे कसब कोल्हे गट,समर्थक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना करावी लागली असून अपेक्षेप्रमाणे त्यांनी आपल्या दोन्ही गडावरील नेत्यांच्या आदेशाबरहुकूम काम करून तो विषय नगराध्यक्ष विजय वहाडणेंसह मंजूर केला असून ‘दुष्काळी जनतेला कोणीही वाली नाही’ हे दाखवून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे कोल्हे गटात मनसबदारीवर असलेल्या सेनेच्या शिलेदारांनीच हि खिंड लढविण्याचे काम करून सर्वात प्रथम शिवसेनेला ग्रामीण भागात स्थान निर्माण करण्याचे काम करणाऱ्यांना कोलदांडा घालत कुऱ्हाडीचा दांडा होण्याचे महतभाग्य मिळवले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर सर्वसाधारण सभेत ऐन वेळच्या विषयात एस.जी रस्त्याला देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख स्व.बिपीन रावत यांचे नाव देण्याचा विषय मांडला त्या वरून नगरसेवक विजय वाजे यांनी हरकत घेतली व आपली जमीन गेली त्या ठिकाणचे नगरपरिषदेकडून पैसे घेतले नाही असा दावा करून आपल्या आई-वडिलांचे किंवा चुलत्यांचे नाव द्यावे असा आग्रह धरला.सभागृहात हे काय चालले आहे असा सवाल केला आहे व मुख्य विषय पत्रिकेत हा विषय समाविष्ट का केला नाही ऐनवेळच्या विषयात का घेतला असा आरोप करत नगराध्य वहाडणे यांना विरोध सुरु केला.त्यावरून नगरसेवक कोल्हे गटाचे सेनेचे नगरसेवक कैलास जाधव यांनी त्यांना घरचा आहेर देत त्यांचा भरसभेत निषेध केला व सभेतून जाऊ लागले.मात्र काहीं नगरसेवकांनी त्यांना पुन्हा सभेत बसवले.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगरपरिषदेची बहुदा अखेरची सर्वसाधारण सभा आज मोठ्या उत्साहात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून त्यात एकूण ऐन वेळच्या विषयासह ३७ विषय सभागृहासमोर ठेवले होते.त्यात हा राडा झाला आहे.
सदर प्रसंगी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी,भाजप गटाचे गटनेते रवींद्र पाठक,सेनेचे गटनेते योगेश बागुल,राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप वर्पे,दिनेश पवार,कैलास जाधव,जनार्दन कदम,मेहमूद सय्यद,विजय वाजे,अनिल आव्हाड,सत्येन मुंदडा,संदीप पगारे,ऐश्वर्या सातभाई,सपना मोरे,दीपा गिरमे,शमीमबी शेख,प्रतिभा शिलेदार,भारती वायखिंडे,वर्षा शिंगाडे,श्रीमती वर्षा गंगूले,ताराबाई जपे,हर्षा कांबळे,आदींसह बहुसंख्य नगरसेवक,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,आरोग्य निरीक्षक सुनील आरणे,ज्ञानेश्वर चाकणे,रोहित सोनवणे,सभा कामकाज प्रमुख प्रशांत उपाध्ये आदींसह विविध विभाग प्रमुखांसह कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रसंगी हा विषय सेनेचे गटनेते योगेश बागुल,भाजप गटनेते रवींद्र पाठक आदींनी सभा पटलावर ठेवला होता.त्यात त्यांनी,”कोपरगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी निळवंडे धरणावर सर्व शासकीय मंजुऱ्यासह आरक्षित असलेले पिण्याचे पाणी भविष्याच्या दृष्टिने फायद्याचे ठरणार आहे.त्यामुळे निळवंडे धरणावरील आरक्षण रद्द करू नये” अशी मागणी केली होती.
त्यावर अध्यक्ष वहाडणे यांनी,”आधी पाच क्रमांकाच्या तलावाला तांत्रिक मंजुरी दिल्या बद्दल आ.काळे यांचे स्वागत करून जीवन प्राधिकरणाने तलावाला तांत्रिक मंजुरी देताना निळवंडे धरणावरील आरक्षण रद्द करण्याची अट का घातली ? असा सवाल केला.व निळवंडेच्या दुष्काळी गावांना पाणी आधी मिळून कोपरगाव शहराला पाणी मिळत असेल तर उत्तम अशी सारवासारव करून घेतली आहे.
निळवंडेचा स्वयंपाक नाही आणि पंगत बसली-सय्यद
“निळवंडे बाबत स्वयंपाक नाही,साहित्य नाही,अन पंक्तीला बसायला कसे लागले ? असा टोला लगावला,कोल्हे गट व त्याचे नगरसेवक सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असताना त्या पेक्षा मोठे झाला का ? असा भीमटोला लगावला.व आ.काळे शिर्डी साईबाबा संस्थानवर नियुक्ती झाल्यावर कोल्हे गटाने राजकारणासाठी निळवंडेचा वापर सुरु केला”-मेहमूद सय्यद,नगरसेवक ,कोपरगाव नगरपरिषद.
त्या वेळी सप्नील निखाडे यांनी,”पाच क्रमांकाच्या तलावाच्या कामाचा व ४२ कोटी रुपयांच्या पाणी योजना व निळवंडे बंदिस्त जलवाहिनींच्या कामाची मागणी आम्हीच केली असल्याचा” दावा केला त्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली असल्याची कबुली दिली आहे.मात्र आम्ही निळवंडेवरील दावा सोडणार नाही असा राणा भीमदेवी दावा ठोकला.त्याला सेनेचे जाधव यांनी दुजोरा दिला.व फुकट पाणी मिळणार आहे.व निळवंडे कालव्यांना ५०० कोटी (मिळाले नसताना ) तर बंदिस्त जलवाहिनींला २६० कोटी साई संस्थाननें खर्च करून पाणी देणार आहे.हे झाले नाही तर कोपरगावतील जनता माफ करणार नाही असा कांगावा केला.व सातभाई अध्यक्षा असताना पाणी पुरवठा योजनेला सात लाख आम्हीच भरले” असा दावा ठोकला.(पण सातभाई तेंव्हा काळे गटात होते हे सांगायला सोयीस्कर विसरले)व निळवंडेचे पाणी आत्ता आले नाही तर कधीच येणार नाही अशी भविष्यवाणी केली.त्यावर अध्यक्ष वहाडणे यांनी,”आपण या साठी पत्रकार परिषद घेतली व निळवंडेसाठी आरक्षणासाठी मागणी केली”असल्याचे समर्थन केले.व “बागुल व पाठक यांनी पत्र दिले” याची पृष्टी केली.त्याला नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी जोरदार हरकत घेतली.व “काळेंचे पत्र कधी आले ते वाचा” असा वर्मावर टोला हाणला. व निळवंडे बाबत स्वयंपाक नाही,साहित्य नाही,अन पंक्तीला बसायला कसे लागले ? असा टोला लगावला,कोल्हे गट व त्याचे नगरसेवक सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असताना त्या पेक्षा मोठे झाले का ? असा शालजोडा लगावला.व आ.काळे शिर्डी साईबाबा संस्थानवर नियुक्ती झाल्यावर कोल्हे गटाने राजकारणासाठी निळवंडेचा वापर सुरु केला असल्याचे वास्तव मांडले आहे.व पाणी आरक्षणाचा अधिकार जीवन प्राधिकरणाला नाही तो गोदावरी महामंडळालाच आहे.असा वास्तवदर्शी जोरदार प्रहार केला.व आपण शहराला रेल्वे मंजूर करा अशी मागणी केली होती ती जशी मान्य होणार नाही तसा प्रकार कोल्हे गटाचा असून निवडणूक आली की नको ते आश्वासने देऊन निळवंडेची पिपाणी वाजवतात याची आठवण करून दिली आहे.व न्यायालयाचा आदेश येऊ द्या मग काय व्हायचे ते होईल,”आधीच बोलाची भात आणि बोलाची कढी उतू जाऊ देऊ नका” असे सुनावले आहे.त्यावर त्यांची बोलती बंद केली.बोरावके यांनी माजी आ.कोल्हेच्या काळात,”आधी दारणाचे आरक्षण रद्द का केले ? याचा कोल्हे गटाच्या नगरसेवकांना रास्त जाबसाल केला.त्यावर त्यांचेकडे उत्तर नव्हते.वर्पे यांनी कोल्हे गटाचे उट्टे काढताना पाणी कोणते घ्यायचे,शुद्ध पाणी कोणते ? दारणाचे की,निळवंडेचे हे कोपरगावकरांना माहिती आहे.पन्नास वर्ष ते पीत आहे.त्यांना काहीही झालेले नाही.उगीच बाऊ करून मतांची बेगमी नको.व “माझे ते माझे व तुझे तेही माझे” असे करू नका असा सल्ला कोल्हे गटांच्या नगरसेवकांना दिला.व पाच क्रमांकाच्या तलावाचे आंदोलने सुरु केल्यावर तो प्रश्न ऐरणीवर आला असल्याची आठवण करून दिली आहे.व पहिल्यांदा १९ जानेवारी २०१९ च्या सभेत घेतला होता याची आठवण करून दिली आहे.व हा तलाव आधी केवळ १७ कोटींचा होता.तो आपल्या नेत्यांनी ४० कोटींचा केला असल्याची आठवण करून दिली आहे.व कोपरगाव शहराची वितरण व्यवस्था सुधारावी लागेल तेंव्हाच पाणी मिळेल असा रास्त दावा करून कोल्हे गटास आरसा दाखवला आहे.सुरुवातीला जीवन प्राधिकरणाने आरक्षणाचा मुद्दा घेतल्याने रान पेटले आहे.यावर बोट ठेवले आहे.निळवंडे व दारणा हे दोन उपखोऱ्यात आहे त्यामुळे ते पाणी येणार नाही.निळवंडेच्या पाण्याला विरोध नाही मात्र मात्र उद्भव निश्चित करण्याचे व आरक्षण ठरविण्याचे अधिकार शासनाचे आहेत असे खडसावले आहे.व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोपरगावसाठी दारणाचे ०२ डिसेंबर रोजी आणखी पाणी आरक्षण वाढवले असल्याची नवीन माहिती दिली असल्याचा दावा केला.व कोल्हे गटाला बॅक फुटावर ढकलले.त्याला मंदार पहाडे यांनी जोराचा दुजोरा दिला.शेवटी या वादात माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई यांनी मध्यस्थी करत संदीप वर्पे यांनी पाच क्रमांकाच्या तलावाला सुरुवात केली.व त्यांचे नेते आ.काळे यांनी त्यास तांत्रिक मंजुरी दिली असल्याची थेट व वास्तवदर्शी कबुली दिली आहे.त्यांनतर अखेर वाद मिटवला गेला आहे.मात्र निळवंडे धरणांचे पाणी नियमबाह्य पद्धतीने मंजूर केल्याचे सांगण्याची हिंमत केली नाही.
त्यातील विषय क्रमांक ३५ हा वादग्रस्त विषय सोडून सर्व विषय वगळता बाकी विषय आवाजी मताने मंजूर करण्यात आले आहे.असले तरी स्वच्छता विषयावर मात्र त्याला चांगलीच खडाजंगी झाली असून त्या विषयावर त्यांनी ठेकेदार विश्वास पवार यांना नगराध्यक्षसह सर्व नरसेवक यांनी फैलावर घेऊन त्यांचे गाड्या फिरण्याचे किलोमीटर गृहीत धरून बिल देण्याचा ठराव पास करण्यात आला आहे.त्याबाबत संदीप वर्पे यांनी आपण या विषयाचा बैठक संपल्यावरही पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे प्रशासन व ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहे.यात सपना मोरे यांनी स्वच्छता विभागाच्या कारभारावर बोट ठेवले तर पाठक यांनी ठेकेदारांची माणसे वजन वाढविण्यासाठी वाहनात दगडगोटे व लाकडे टाकताना पाहिले व त्याचे छायाचित्र आपण आरोग्य निरीक्षक यांना पाठवले असे सांगून त्याला दुजोरा घेतला तर काही नगरसेवकांनी दवाखान्याच्या कचरा उचलताना काही कर्मचारी जास्त वेळ वाहने उभे करून त्यांचेकडून पैसे घेतात असा गंभीर आरोप करून कारवाईची मागणी केली.
“परजणे लॉ कॉलेजला वर्षाला केवळ एकवीस हजार भाडे कसे घेता असा सवाल करत एकीकडे सामान्य नागरिकांना घर पट्टी थकली तर दोन टक्के व्याज आकारता आणि इकडे मोठ्या लोकांना नगरपरिषदेची मालमत्ता मोठ्या सवलतीच्या दरात कशी देता ? मी दुप्पट वार्षिक भाडे देतो सदर इमारत मला वापरायला द्या.दहा आर.क्षेत्राचे इतके कमी भाडे कसे असे म्हणत गरिबांचा लिलाव करणाऱ्या पालिकेवर आपण थुंकतो,धिक्कार करतो यावर कोल्हे गट गप्प कसा बसू शकतो”-अनिल आव्हाड,नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.
दरम्यान कोपरगावातील नामदेवराव परजणे लॉ कॉलेजच्या दीर्घ पल्ल्याच्या करार नूतनीकरण करण्यास अनिल आव्हाड,नगरसेवक जनार्दन कदम,मेहमूद सय्यद यांनी जोरदार हल्लाबोल करत विरोध केला आहे.व हा करार रद्द करण्याची मागणी केली.तर अनिल आव्हाड यांनी भाडेवाढीचा विषय लावून धरला आहे.जर नाही वाढवली तर नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांची दोन वर्षाची घरपट्टी रद्द करावी अशी मागणी लावून धरली आहे.सामान्य जनतेला वेगळा न्याय व मोठ्या नेत्याना वेगळा न्याय देता येणार नाही ते मोफत शिक्षण देता का असा सवाल केला आहे.व वर्षाला केवळ एकवीस हजार भाडे कसे घेता असा जाबसाल केला आहे.एकीकडे सामान्य नागरिकांना घर पट्टी थकली तर दोन टक्के व्याज आकारता आणि इकडे मोठ्या लोकांना नगरपरिषदेची मालमत्ता मोठ्या सवलतीच्या दरात कशी देता ? मी दुप्पट वार्षिक भाडे देतो सदर इमारत मला वापरायला द्या.दहा आर.क्षेत्राचे इतके कमी भाडे कसे असे म्हणत गरिबांचा लिलाव करणाऱ्या पालिकेवर आपण थुंकतो,धिक्कार करतो.फ्रुट मार्केटच्या इतक्याशा गाळ्यास चार ते सहा हजार भाडे तर इथे फुकट देता हा काय प्रकार आहे.कोल्हे गटाकडेन निर्देश करून तुम्ही गप्प का ?असा घरचा आहेत प्रदान केला.व सभागृह डोक्यावर घेतले आहे.मुख्याधिकाऱ्यांनी हा विषय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे जावे मात्र कमी भाडे करार करू नये असा सल्ला द्यायला नगरसेवक अनिल आव्हाड विसरले नाही.
तर कैलास जाधव यांनी पस्तीस एकर जमीन एकावेळी घेणाऱ्यांना संस्थाचालकास सवलतीची खैरात कशासाठी असा सवाल विचारला आहे.
दरम्यान नगरपरिषदेची ही सभा १.३० वाजेच्या दरम्यान सुरू झाली ती मध्ये अर्ध्या तासांची विश्रांती घेऊन ६.३० पर्यंत म्हणजे तब्बल पाच तास चालली मात्र या सभेचे इतिवृत्त देण्यासाठी दोन्ही गडावरील नगरसेवक विश्वासार्ह न वाटल्याने दोन्ही गडप्रमुखांनी आपले खबरीलाल सभागृहाच्या बाहेर दरवाजाला कान लावून जातीने हजर ठेवले होते.व मिनीटामीनिटांची खबर आपल्या वतन दारणा कळवत होते.
नगरसेवक संदीप वर्पे व सातभाई यांनी मात्र आम्ही फक्त शिफारस केली आहे.निर्णय घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे.टिपणी चुकीची ठेवल्याचा आरोप प्रशासनावर केला आहे.वीस वर्षापूर्वी करार कोणी केला असा जाबसाल केला आहे.आम्ही फक्त सहानुभूतीपूर्वक विचार करा असे म्हटलं आहे.मंजुरीचा आग्रह धरला नाही हि बाब लक्षात आणून दिली आहे व आपली सुटका करून घेतली आहे.त्याला निखाडे यांनी दुजोरा दिला आहे तर नगरसेविका सातभाई यांनी शिक्षण संस्था आहे.असा सल्ला दिला तर नगरसेवक कदम यांनी मात्र आम्ही शिक्षण संस्था चालवतो चाळीस हजार रुपये भरतो आम्ही कुठे तक्रार करतो तसा त्या संस्था चालकांनी भरावी असे आवाहन केले आहे.व मुदत संपली तर ती वाढून देऊ नका असा जाहीर इशारा दिला आहे.त्यावेळी नगराध्यक्ष वहाडणे यांनी हा विषय अखेर सर्व माहिती घेऊन पुढील बैठकीत ठेवण्याचे जाहीर केले आहे.मात्र नगरपरिषदेला भाडेवाढीवरून साडेचार वर्षांपूर्वी न्यायालयात खेचणाऱ्या संस्थाचालकांची टिपणी सभा पटलावर आलीच कशी याची काय गोम आहे यावर अध्यक्षांसह कोणीच बोलले नाही. अखेर अध्यक्ष वहाडणे यांनी नोरोपाचे भाषण करून राष्ट्रगीत गाऊन सभा संपल्याचे जाहीर केले आहे.