जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“…त्या”रस्ता लुटीतील आरोपीही कोपरगावातीलच!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नगर-मनमाड मार्गावर मारुती शोरूम जवळ व अशोका हॉटेल समोर १९ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास पावणे सहाच्या सुमारास फरशी घेऊन उभा असलेला ट्रक चालक,मालक व क्लीनरला हाती असलेल्या कत्तीचा धाक दाखवून”आम्ही कोपरगावचे “दादा” असून तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर तुमच्या कडील असेल-नसेल ती सर्व रक्कम द्या.अशी धमकी देऊन त्यांच्या पाकिटातील पंधरा हजारांची रक्कम काढून घेऊन पोबारा केल्याच्या त्या गुन्ह्यातील आरोपी हे कोपरगावातील असल्याचे सिद्ध झाले असून त्यांची नावे शरद बाळकृष्ण विघे (वय-२३) धंदा- मजुरी, रा.साईबाबा कॉर्नर वंजार गल्ली कोपरगाव,सागर चंद्रसेन लोखंडे,(वय-२५),हा सराईत गुन्हेगार असून यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.रा.खिर्डी गणेश,रोहिदास उर्फ सोन्या राजेंद्र गवांदे,(वय-२३) रा.येसगाव ता.कोपरगाव अशी आहेत.त्यांना अटक झाल्याने कोपरगाव व शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या बाबत वेगाने सूत्रे हलवून आरोपीना त्याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्यांना कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे करण्यात आले होते न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ती नुकतीच संपली असून त्यांना नुकतेच न्यादंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले होते न्यायालयाने त्यांना आता पुन्हा न्यायिक कोठडीत पाठवले आहे.

सदरची सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेले ट्रक मालक बाळासाहेब शिंदे यांनी आपल्या ट्रक मध्ये गुजरात राज्यातील मोरबी येथून आपल्या ट्रकमध्ये कोपरगावला अनुपभाई पटेल यांच्या दुकानात खाली करण्यासाठी फरशी भरली होती व ती गाडी घेऊन ते रविवार दि.१९ जानेवारीला पहाटे लवकरच कोपरगावात आले मात्र एवढ्या सकाळी दुकान उघडत नाही म्हणून त्यांनी कोपरगावात मारुती शोरूम जवळ अशोका हॉटेल समोर आपला ट्रक उभा केला.व रात्री बसलेले असताना सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास त्यांना काही इसम ट्रकची खिडकी उघडण्यासाठी व बिलटी पाहण्यासाठी काही इसम हाक मारत असल्याचे दिसून आले.त्यांनीं या इसमांना त्यात फरशी असल्याचे सांगितले मात्र त्यांनी खिडकी उघडण्याचा आग्रह धरला त्यावेळी यांना कदाचित पोलीस असतील या धाकाने ट्रकचा दरवाजा उघडला असता त्यांना तीन इसम दिसून आले. त्यातील दोघे आत गाडीत आले.तिसरा हातात कत्ती हातात घेऊन दरवाजात उभा होता. त्यांनी गाडीत आत आल्यावर,शिवीगाळ करून पैसे दे,नाहीतर तुझे हातपाय काढील भाडखाऊ, तुला जगायचे आहे का ? तुला जीव नकोसा झाला आहे का ? असे म्हणून बाहेर दरवाजात उभा असलेल्या आरोपीने आतील आरोपीकडे कत्ती दिली.व आम्ही कोपरगावचे “दादा” आहोत असे म्हणून आपल्या गळ्याला कत्ती लावली व असेल नसेल ते सर्व पैसे काढा.असे म्हणाला त्याच वेळी दुसऱ्या आरोपीने माझ्या कडील व क्लिनर संतोष कचरू जाधव याचे कडील पाकीट हिसकावून घेऊन त्यातील पंधरा हजार रुपये घेऊन पोबारा केल्याने कोपरगाव सह तालुक्यात खळबळ उडाली होती.पोलिसांपुढेही या तपासाचे आव्हान उभे ठाकले होते.या घटनेने ट्रकचालक,मालक क्लिनर असे तिघेही हबकून गेले होते त्यांनी दिवस उगावल्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजी.क्रं.२४/२०२० अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या बाबत वेगाने सूत्रे हलवून आरोपीना त्याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्यांना कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे करण्यात आले होते न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ती नुकतीच संपली असून त्यांना नुकतेच न्यादंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले होते न्यायालयाने त्यांना आता पुन्हा न्यायिक कोठडीत पाठवले आहे.पोलिसांनी त्वरेने हालचाल करून आरोपीना अटक केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close