जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहर,दारणाचे आरक्षण कोणी घालवले ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगावच्या पाण्याचा तमाशा भाग-२

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राजकारणात मोठी स्वप्ने पाहायला हवीत अन्यथा प्रगती किंवा विकासाचे मार्गच खुंटूंन जातील आणि स्थितिवादच अंगवळणी पडेल.मात्र ती स्वीकारण्यासाठी जी पूर्व तयारी करावी लागते,भक्कम पाया उभारावा लागतो त्याकडे दुर्लक्ष झाले तर वाट्याला फजिती शिवाय काहीच येत नाही.कोपरगावच्या राजकीय नेत्यांची अवस्था अशीच काहीशी झाल्याने ना त्याचा फायदा शेतकऱ्यांना ना झाला, ना नागरिकांना, ना ग्रामस्थांना.आता हेच पहा ना कोपरगाव शहराचे पाणी दारणा वरून आणायचे की निळवंडेवरून यातच वर्तमान राजकीय धुरिणांनी नमनालाच घडाभर तेल वाया घातले आहे.करणे काहीच नाही मात्र निवडणुका आल्या की येथील जनतेला केवळ वेड्यात काढण्याचा जोरदार धंदा तेजीत येतो.व निवडणुका संपन्न झाल्या व आयोगाच्या मतपेट्या भरून गाड्या मार्गी लागल्या की पहिले पाढे पंचावन्न हा क्रम सुरू होतो.व पाच वर्ष या मंडळींना त्या विकासाची आठवण येत नाही.अशीच घटना कोपरगावात नुकतीच घडली आहे.

मा.राज्यमंत्री (जलसंपदा) यांचेसोबत दि.२६ जून २०१८ रोजी बैठक झाली मा.राज्यमंत्री यांनी सूचना दिल्या की,”शिर्डी संस्थान व कोपरगाव शहराकरिता पूर्वीचे दारणा धरणावरील मंजूर आरक्षण रद्द करून ते निळवंडे धरणावर करण्यात यावे”.यामुळे उदभवणाऱ्या जनक्षोभाची व न्यायालयीन प्रकरणाची पूर्ण कल्पना मा.राज्यमंत्री यांना देण्यात आली.परंतु राज्यमंत्री यांनी सदर पाणी आरक्षण निळवंडे धरणातूनच (या ठिकाणी “च” हा प्रत्यय लावलेला होता हे पूर्ण लक्षात घेणे गरजेचे आहे) देण्याच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

कोपरगाव नगरपरिषदेची व जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक तोंडावर आली हे पाहून येथील नेत्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्यांनी पत्रकार परिषदा घेण्याचा व रस्त्यावरील पढीक पोपटा सारखे बोलण्याचा धंदा जोरात सुरु केला.त्याला ईशान्य गडावरील युवराज अपवाद असण्याची शक्यता कमीच.आणि झालेही तसेच.गट पंधरावाड्यात आपल्या भाजपच्या (?) कार्यालयांत मनसबदारांच्या उपस्थितीत घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत त्यांनी वर्तमानात आ.काळे यांनी कोपरगाव शहराचे पाणी आरक्षण कसे दारणावरून घालवले.जीवन प्राधिकरणास हे आरक्षण रद्द करण्याचे आदेश कोणी दिले ? असे टोकून त्यांच्यावरच संशयाची सुई रोखली व आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु ठेऊन आपली मतांची बेगमी सुरु ठेवली होती.त्यासाठी प्रभाग निहाय बैठका घेऊन त्यांनी (आ.काळे) यांनी शहराची कशी फसवणूक केली याचे साग्रसंगीत वर्णन सुरु करून त्यासाठी शहरात रंगीतसंगीत पत्रके कार्यकर्त्यांच्या हातात टेकवून त्याचे वितरण करून चांगलीच दमछाक केली आहे.

दरम्यान आमच्या प्रतिनिधींला याबाबत जनतेची कशी फसवणूक सुरु आहे याचे सबळ पुरावेच हाती आले आहे.त्यात तत्कालीन माजी आमदार व त्यांच्या वरिष्ठ व जेष्ठ नेत्यांचे फारच जमत असलेल्या ‘राज्यमंत्री विजय शिवतारे’ या मंत्र्याने दि.२८ जून २०१८ रोजी दुपारी ०४ वाजता कार्यकारी संचालक (त्या वेळी अजय कोहिरकर) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांचे अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त हाती आले आहे. त्यांनी त्यात पहिल्या क्रमांकाने घेतलेल्या चर्चेत हा ‘दारणा’ धरणावरील विषय घेतला आहे.व त्यात प्रास्तविक नाशिक येथील जलसंपदाचे मुख्य अभियंता ( त्या वेळी किरण कुलकर्णी ) यांनी प्रास्तविक केले आहे.त्यात ते म्हणतात.”त्यांची मा.राज्यमंत्री (जलसंपदा) यांचेसोबत दि.२६ जून २०१८ रोजी बैठक झाली मा.राज्यमंत्री यांनी सूचना दिल्या की,“शिर्डी संस्थान व कोपरगाव शहराकरिता पूर्वीचे दारणा धरणावरील मंजूर आरक्षण रद्द करून ते निळवंडे धरणावर करण्यात यावे”.यामुळे उदभवणाऱ्या जनक्षोभाची व न्यायालयीन प्रकरणाची पूर्ण कल्पना मा.राज्यमंत्री यांना देण्यात आली.परंतु राज्यमंत्री यांनी सदर पाणी आरक्षण निळवंडे धरणातूनच (या ठिकाणी “च” हा प्रत्यय लावलेला होता हे पूर्ण लक्षात घेणे गरजेचे आहे) देण्याच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.शासनाचे धोरण बंद पाईप लाईन मधूनच पाणी पुरवठा करण्याचे आहे.सध्या होणारा पाणी व्यय कमी करण्यासाठी व पिण्याचे पाण्यास प्रथम प्राधान्य आहे.म्हणून असे करावे अशा सूचना आहेत.असे मा.राज्यमंत्री महोदय यांच्या सूचना आहेत.असे मुख्य अभियंता नाशिक यांनी सादर केले आहे.

वरील बैठकीचे इतिवृत्त वाचले तर कोणाही सुज्ञ माणसाचे पित्त खवळल्या शिवाय राहाणार नाही. वरून निळवंडे कालवा कृती समितीवर चुकीचे आरोप करून आपल्या पापावर पांघरून घालायचे काम या निर्लज्ज मंडळींनी राजरोसपणे सुरु ठेवले आहे.याला काय म्हणणार? (अशा राजकीय नेत्यांना जनतेने आपल्या पायाजवळ उभे करू नये हे उत्तम.) आता त्या वेळी जलसंपदा मंत्री कोण होते व राज्यमंत्री कोण होते व कोपरगावचे आमदार कोण होते हे आमच्या प्रतिनिधीने वेगळे सांगण्याची गरज नाही.व दारणा धरणावरील आरक्षण कोणी रद्द केले हे उघड झाले आहे.त्यामुळे आ.काळेवरील आरोप निराधार झाला आहे.हे उघड झाले आहे.

या शिवाय याबाबतीत आणखी एक बाब लक्षवेधून घेण्यासारखी आहे.ती हि की.त्या वेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव शहराला पाणी का कमीं पडते ? याचा शोध घेतला असता त्या ठिकाणच्या साठवण तलावानजीक कोपरगाव तालुक्याचे नेते म्हणविणाऱ्यांनी जमिनी घेऊन विहिरी करून त्या ठिकाणी पाईप द्वारे मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची चोरी आपल्या शेतीसाठी करताना आढळून आले होते.त्याचे व्हिडिओ त्यांनी पत्रकारांना घेऊन त्यांच्या समक्ष बनवून सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध करून या नेत्यांना उघडे पाडले होते.व त्या बाबत तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना नगरपरिषदेचे पत्र पाठवून कोपरगाव येथील नगरपरिषदेच्या साठवण तलावातून पाणी चोरी कोण करते याचे स्पष्ट आरोप केला आहे.त्यामुळे हे पाणी कोण घालवत आहे.व कोण पाण्याची चोरी करीत आहे.हे उघड झाले आहे.या शिवाय यांचे पाणी परवाने किती द.ल.घ.फुटाचे आहे.व प्रत्यक्ष किती पाणी वापर करतात याचे पुरावे लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.

दरम्यान यांचा आणखी एक आरोप आहे की,आम्ही कोपरगावला पाणी घेताना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे शेती सिंचनाचे पाणी घेत नाही तर बिगर सिंचनाचे पाणी घेत आहे.व शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्रातील कोणतेही पाणी कमी होणार नाही असे लंगडे समर्थन केले आहे.मात्र तेही किती थोतांड आहे याचाही पुरावा यांच्या प्रतिनिधींच्या हाती आला असून यातून निळवंडेच्या लाभक्षेत्रातील याचा उहापोह होणे गरजेचा आहे.

या शिर्डी साईबाबा संस्थान,शिर्डी नगर पंचायत,व कोपरगाव नगरपरिषद यांचा अतिरिक्त १६.६४ द.ल.घ.मी.भार निळवंडेवर पडणार आहे.व त्यातून राहाता व कोपरगाव तालुक्यातील ०५ हजार २३३ हेक्टर म्हणजेच १३ हजार ०८२ एकर क्षेत्र सिंचनापासून दुरावले जाणार आहे.त्यात कोपरगावचे भिजणारे क्षेत्र किती असा सवाल आपसुकच निर्माण होणार आहे.ते क्षेत्र ०५ हजार ६१६ हे.आहे.े समजले म्हणजे दुष्काळी तेरा गावे व अकरा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुष्काळी गावांचे पाणी जाऊन अतिरिक्त शेती सिंचनाचे पाणी जाणार हे उघड आहे.परिणाम स्वरूप ही गावे पूर्ण दुष्काळीच ठेऊन आपली सत्तेची पोळी पुन्हा एकदा भाजण्याची सोय हि मंडळी करत आहे हे कोणाही सुज्ञास समजण्यास वेळ लागणार नाही व हे किती मोठे षडयंत्र राबवले जात आहे.हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.म्हणजे तब्बल बावन्न वर्ष आम्हाला पाणी या मंडळींनी दिले तर नाहीच पण खोटी उदघाटने करून जनतेला शेतकऱ्यांना केवळ मते मिळविण्यासाठी फसवले आहे.निळवंडे कालवा कृति समितीने शेतकऱ्यांना संघटित करून रस्त्यावरील आंदोलने करून लाठ्या काठ्या खाऊन व जेलमध्ये जाऊन आणलेले पाणी पळविण्याचे षडयंत्र कसे राबवले आहे.हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही व या कोपरगावातील प्रस्थापित मद्य सम्राट नेत्यांच्या विरुद्ध आपोआप मुठी आवळल्याशिवाय राहणार नाही.

क्रमशः….

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close