जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समता दिनदर्शिका प्रकाशन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता दिनदर्शिकेचे प्रकाशन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते व कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्यां अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

दिनदर्शिका ही वर्षातील तारखा कोष्टक स्वरूपात दाखवण्यासाठी वापरली जाते. सर्वसाधारणपणे कोणत्याही दिनदर्शिकेत तारखांबरोबर महिने, आठवड्याचे वार, सुट्ट्या इत्यादी माहिती दिली जाते.याखेरीज दिनदर्शिकेच्या प्रकारानुसार त्यामध्ये अधिक माहिती दाखवली जाते.अशीच दिनदर्शिका समता पतसंस्थेने नुकतीच प्रकाशित केली आहे.तिचे सभासदांनी स्वागत केले आहे.

दिनदर्शिका ही वर्षातील तारखा कोष्टक स्वरूपात दाखवण्यासाठी वापरली जाते. सर्वसाधारणपणे कोणत्याही दिनदर्शिकेत तारखांबरोबर महिने, आठवड्याचे वार, सुट्ट्या इत्यादी माहिती दिली जाते.याखेरीज दिनदर्शिकेच्या प्रकारानुसार त्यामध्ये अधिक माहिती दाखवली जाते उदा.मराठी दिनदर्शिकेत एकदशी,संकष्टी व मराठी सणांची माहिती असते,तर बॅंकेच्या दिनदर्शिकेत बॅंकेच्या सुट्ट्यांची महिती असते.या दिनदर्शिकेची आपल्या ठेवीदार,सभासदांसाठी,कर्जदार,हितचिंतक यांच्यासाठी घरात,कार्यालयात वापरण्यात येते.त्याचा लाभ नागरिकांना होत असतो.या बाबत समता नागरी पतसंस्था आघाडीवर असते.आगामी वर्षाची दिनदर्शिका नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संचालक कचरू मोकळ,गुलशन होडे,व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,किरण शिरोडे,प्रदीप साखरे,नगरसेवक जनार्दन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी तहसीलदार बोरुडे म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून कोपरगावातील व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून भविष्याच्यादृष्टीने शहाराबरोबरच ग्रामीण भागातील व्यावसायिक समृद्ध कसे होतील यासाठी लवकरच समृद्धी महामार्गाचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे नियोजन केले जाईल तसेच तरुण व्यापारी व्यावसायिकांना एक दिशा देणारा हा प्रकल्प ठरणार असून कोपरगाव शहराबरोबरच तालुक्यातील व्यापाऱ्यांना समता पतसंस्था व व्यापारी महासंघाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देणार आहोत.तसेच त्यांनी समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी व्यापारी महासंघाच्यावतीने मनोगत व्यक्त करत शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला.

प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केले आहे.

प्रारंभी तहसिलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यालयाला भेट देऊन पतसंस्थेच्या दैनंदिन कामकाजाची माहिती जाणून घेत फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम,ऑनलाईन समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभागाची कार्यप्रणाली समजून घेत कौतुक केले तर समताच्या सहकार उद्योग मंदिराला भेट देत सहकार मंदिरातील अगरबत्ती,कापूर,कापसाची वाती,वस्त्र निर्मिती अशा विविध सुरु असलेल्या उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली.

सोहळ्याचे सुत्रसंचलन एच.आर.श्रीमती उज्वला बोरावके यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close