जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात सेना प्रमुखांची जयंती उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९४ वी जयंती निमित्त कोपरगाव शहरात कोपरगाव नगरपरिषद शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ.आंबेडकर चौक,विघ्नेश्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक आशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी बाळासाहेबांचं प्रतिमास्थळ फुलांनी सजवून त्यांना जयंती निमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.

सदर प्रसंगी सेवानिवृत्त सैनिक विजय भास्कर व कोपरगाव पंचायत समितीचे सेनेचे सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या सभागृहात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्प वाहून पूजन केले आहे.त्यावेळी माजी सैनिक विजय भास्कर यांनी,’आमच्या कार्याची नगरपरिषदेने दखल घेतल्याबद्दल आभार मानून आपल्या आयुष्याचे चीज झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं बाळासाहेबांच्या जयंतीला राज्यभरात विशेष महत्व आले आहे. यानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्व.बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे कोपरगाव शहरातील अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले आहे.महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकासआघाडी करत सत्तास्थापन केली आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्राला शिवसेनेला मुख्यमंत्री मिळाला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशातच आज शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांकडून त्यांच्या विचाराचे स्मरण कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,माजी सैनिक विजय भास्कर,आदींनी आदरांजली अर्पण केली आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष योगेश बागुल,उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,नगरसेवक मंदार पहाडे,विवेक सोनवणे,सेनेचे शहराध्यक्ष सनी वाघ,चेतन खुबानी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी गोर्डे,माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव,आदींसह बहुसंख्येने नगरसेवक,अधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.सदर प्रसंगी सेवानिवृत्त सैनिक विजय भास्कर यांनी व कोपरगाव पंचायत समितीचे सेनेचे सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या सभागृहात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्प वाहून पूजन केले आहे.त्यावेळी माजी सैनिक विजय भास्कर यांनी,’आमच्या कार्याची नगरपरिषदेने दखल घेतल्याबद्दल आभार मानून आपल्या आयुष्याचे चीज झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यक्रमा अगोदर रिक्षा संघटना व रिक्षा सहकारी पतसंस्था यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.त्या नंतर विघ्नेश्वर चौकात शहराध्यक्ष सनी वाघ,गोदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या पुढाकाराने आदरांजली वाहण्यात आली आहे.तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात कोपरगाव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष योगेश बागुल यांच्या पुढाकाराने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमेस अभिवादन केले आहे.त्यावेळी शिवसैनिकांनी मोठी हजेरी लावलेली आढळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close