कोपरगाव तालुका
धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत निकृष्ठ रस्त्याचे काम,तक्रार दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत गाव अंतर्गत रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु असून हे काम अत्यंत दर्जाहीन होत असून त्यात पुलाचे काम टाळण्यात आले असून अन्य कुठलेही शासकीय निकष पाळले जात नसल्याने या ठेकेदारास बिल अदा करू नये अशी तक्रार त्याच गावातील कार्यकर्ते ज्ञानदेव चांगदेव चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगावचे उपअभियंता यांचेकडे नूकतीच केल्याने धारणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत वर्तमानात स्मशानभूमीरोडचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे.हे काम वेगाने सुरु असताना त्याच गावातील कार्यकर्ते ज्ञानदेव चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या बाबत तक्रार केली आहे.वास्तविक हे काम जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असून त्यांनी हि तक्रार राज्यसरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत वर्तमानात स्मशानभूमीरोडचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे.हे काम वेगाने सुरु असताना त्याच गावातील कार्यकर्ते ज्ञानदेव चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या बाबत तक्रार केली आहे.वास्तविक हे काम जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असून त्यांनी हि तक्रार राज्यसरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यांनी या बाबत शासनाने दखल न घेतल्यास आपण आंदोलन करू असा इशाराही ज्ञानदेव चौधरी यांनी शेवटी दिला आहे.