जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वेस-सोयगाव हद्दीत बेकायदा स्टोन क्रशर-कारवाईची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव ग्रामपंचायत हद्दीत राहाता-वावी रस्त्याच्या लगत बेकायदा स्टोन क्रशर असल्याची माहिती “माहिती अधिकारात” उपलब्ध झाली असून या स्टोन क्रेशरला तेथील कामगार तलाठी रवी सुखदेव इंगळे यांचे अभय लाभले असल्याचा आरोप तक्रारदार कार्यकर्ते बाळासाहेब बळवंत बनसोडे यांनी शिर्डी येथील प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत केला असून त्यामुळे वेस सोयगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी माहिती अधिकारात दि.१८ जानेवारी २०२० रोजी दिलेल्या माहितीत कार्यालयातील उपलब्ध अभिलेखावरून सद्यस्थितीत कोपरगाव तालुक्यात मौजे चांदेकसारे येथे में. गायत्री प्रोजेक्ट ली.यांचे नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी केवळ स्टोन क्रशर साठी परवानगी दिली आहे.या व्यतिरिक्त कोपरगाव तालुक्यात परवानगी प्राप्त कोणताही स्टोन क्रशर व डांबर प्लांट नाही असे स्पष्ट म्हटले आहे.

साकुरी ता.राहाता येथील तक्रारदार बाबासाहेब बनसोडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, मौजे वेस ता.कोपरगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत गट क्रं.२०९/२ क्षेत्र-०.६० आर.येथे अनाधिकृत डांबराचा प्रक्रिया उद्योग सुरु आहे.त्यासाठी २०१६ पासून शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही.त्यावर तेथील कामगार तलाठी जाणिपूर्वक कारवाई करत नाहीत.त्या बाबत वरिष्ठांना तसा अहवाल सादर केलेला नाही.या बाबत आपण तलाठी यांच्या कार्यालयात वारंवार गेलो असता त्यांचे कार्यालय सातत्याने बंद असते.पंधरा दिवसातून ते एकदा कोपरगाव तहसीलदार कार्यलय किंवा वेस येथे उपस्थित राहतात एरवी ते नागरिकांसाठी कायम अनुपलब्ध असतात.त्यांचे व संबंधित डांबर प्लॅन्टधारक यांचे आर्थिक हितसंबंध दडले असल्याने ते त्यांच्यावर कारवाई करीत नाही.यातून शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत आहे.त्यामुळे सदर डांबर प्लान्टधारकावर दंडनीय व फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी,वेस येथील कामगार तलाठी कायम गैरहजर राहतात त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आदी मागण्या बाबासाहेब बनसोडे यांनी शेवटी केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close