शैक्षणिक
…या विद्यालयात नवगतांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत आज १५ जुन शाळेचा पहीला दिवस विदयार्थींचा प्रवेशोत्सव समारंभ उत्साहाने संपन्न झाला आहे.
शाळा प्रवेशोत्सव गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार प्रत्येक शाळेला हा उत्सव साजरा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम-२००९ नुसार शिक्षण हा त्या बालकाचा हक्क झालेलाआहे. याचाच दुसरा अर्थ काय तर ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मूल हे शाळेमध्ये आले पाहिजे.आणि म्हणूनच प्रत्येक मुलांपर्यंत शाळा पोहोचली पाहिजे.याच उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाला सुरुवात झाली.
यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून स्वतंत्र परिपत्रकदेखील काढण्यात आलेले आहे.या परिपत्रकामध्ये शाळा प्रवेशोत्सव कशा पद्धतीने करण्यात यावा याबाबत निर्देश देखील देण्यात आलेले आहेत.त्या अंतर्गत कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात ह उत्सव साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुवर्णा अमृतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
या प्रसंगी विदयालयात आकर्षक रांगोळी काढण्यात आलेल्या होत्या.सर्व विदयार्थीना सुवर्णा अमृतकर,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य राजेश ठोळे,संदीप अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.तसेच मोफत पाठ्यपुस्तके योजने अंर्तगत शालेय पाठ्यपुस्तकांचे देखिल या प्रसंगी वाटप करण्यात आले.
प्रारंभी कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,दिलीप तुपसैंदर सर आदींनी सर्व विदयार्थीना शैक्षणिक वर्षाच्या आरंभी शुभेच्छा दिल्या आहेत.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश गोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षिका उमा रायते यांनी मानले आहे.
या कार्यक्रमाला अनिल अमृतकर,अतुल कोताडे,कुलदीप गोसावी,दीलीप कुडके,अनिल काले आदी शिक्षक,शिक्षिका व पालक विद्यार्थी उपस्थित होते.