कोपरगाव तालुका
देशातून मोदी संकट दूर करण्याची गरज-वाघमारे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जगात कोरोनाचे संकट मोठे असले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय संकट मोठे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे यांनी कोपरगाव येथे बोलताना केले आहे.
आ.आशुतोष काळे यांनी निवडून आल्यावर चार दिवसाआड पाणी मिळत आहे.त्यांनी निवडून आल्यावर आता कोपरगाव शहराला पाणी देण्यासाठी साठवण क्षमता वाढविण्यासाठी १२० कोटींची तांत्रिक मान्यता मिळवली आहे.पण नुसते काम करून भागत नाही.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कमी काम केले होते का? पण त्यांना पराभव पत्करावा लागला याचा विसर पडू देऊ नका”-तुषार वाघमारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभाग.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबीर आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळीं ते बोलत होते.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे,आय.टी.विभागाचे प्रमुख जितेश सरडे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्माकांत कुदळे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन,एम.टी.रोहमारे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेविका प्रतिभा शिलेदार,सौ.माधवी वाकचौरे,वर्षाताई गंगूले,युवती संघाच्या तालुकाध्यक्ष वैशाली आभाळे,महात्मा गांधी प्रदर्शनचे सचिव धरमचंद बागरेचा,फकीर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा वाढदिवस या उपक्रमासाठी का निवडला हे सांगताना त्यांनी देशात वाढलेली महागाई याकडे लक्ष वेधून घेतले आहे.इंधनाचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला परिणामस्वरूप महागाईचे संकट उभे राहिले आहे.यु.पी.ए.सरकारचे पंतप्रधान मनमोहन सिंग असताना याच कच्च्या तेलाचा भाव १०८ डॉलर प्रति बॅरल होते.त्यावेळी दर ७०-७५ रुपयांवर होता.पण आज दर १०९ ते १११ रुपयांवर गेले आहे.हेच खिसेकापू राजकारण्यांचे फोटो प्रत्येक पेट्रोल पंपावर लावले आहेत.त्यापासून आता जनतेने सावध राहण्याची गरज आहे.
कोपरगावात आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात मोठे काम केले आहे.त्यांनी बावीस दिवसाला पाणी मिळत होते ते निवडून आल्यावर चार दिवसाआड पाणी मिळत आहे.त्यांनी निवडून आल्यावर आता कोपरगाव शहराला पाणी देण्यासाठी साठवण क्षमता वाढविण्यासाठी १२० कोटींची तांत्रिक मान्यता मिळवली आहे.पण नुसते काम करून भागत नाही.पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कमी काम केले होते का? पण त्यांना पराभव पत्करावा लागला याचा विसर पडू देऊ नका. आ.काळेंनी काम केले तरी तुम्हाला गाफील राहून चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.उज्वला गॅस मोफतचे आश्वासन त्यांनी दिले होते.आज गॅसही नाही आणि टाकीही नाही अशी फिरकी त्यांनी घेतली.व देशातील तरुणांची बेरोजगारी वाढल्याची टीका केली.ज्यांनी दर वर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते.मात्र अलीकडील काळात तर तरुणांचा एक कोटी रोजगार कमी होत असून सात वर्षात ७ कोटी रोजगार कमी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.व ही आकडेवारी सरकारी असल्याचा दावा केला आहे.२०११-मध्ये बेरोजगारीचा दर ५.६ टक्के होता.तो आज १४.०५ टक्के वाढल्याचा दावा केला आहे.या आधी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे काळात राज्यातीलच नव्हे तर देशभरातील तरुणांना रोजगार दिला जात होता.मात्र आज उलट स्थिती झाली आहे.शेती क्षेत्राची परवड झाल्याचा दावा केला व दिल्लीतील शेतकऱ्यांना दुप्पट भाव.खते मोफत देणार अशी आश्वासने देणाऱ्या भाजपने आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीत गाडीखाली चिरडले असल्याचा दावा केला.याच सरकारच्या काळात वीस हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे सांगून या सरकारला आगामी निवडणुकीत पाय उतार करावे लागेल असे आवाहन केले आहे.त्यावेळी या सरकारला आपण पायउतार करणार का ?असा जाहीर सवाल केला असता व आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विश्वास देऊ शकतो का? असा सवाल विचारला त्याला काहीसा थंडच प्रतिसाद उपस्थितांनी दिल्याचे जाणवले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी केले तर उपस्थितांना जितेश सरडे,आ.आशुतोष काळे मार्गदर्शन यांनी केले तर सूत्रसंचलन माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी केले तर आभार कारभारी आगवन यांनी मानले.