कोपरगाव तालुका
ग्रामविकास अधिकारी घारे कुटुंबीयांना मदत निधी सुपूर्त
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांचे ज्येष्ठ सभासद व कोपरगाव पंचायत समिती अंतर्गत कोळपेवाडी येथील ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब बाळकृष्ण घारे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते.त्यांच्या शहापूर येथील घरी ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी सांत्वनपर भेट दिली त्यावेळी त्यांच्या पत्नी सुमनताई घारे यांचेकडे पाच लाखांचा मदत निधी सुपूर्त केला आहे.
ग्रामविकास अधिकारी घारे यांच्या पत्नी व कुटुंबियांना २.५० लाखांची रुपयांची मुदत ठेव व २.५० लाख रुपयांचा रोख असा ०५ लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे.त्यांच्याकडे असणारे सोसायटीचे कर्ज,भाग व ठेव वजा जाता कर्ज माफ करण्यात आलेले आहे”-एकनाथराव ढाकणे,राज्याध्यक्ष ग्रामसेवक संघटना.
कोपरगाव पंचायत समितीचे कोळपेवाडी येथील ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब घारे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले,दोन भाऊ, असा परिवार आहे.
आज त्यांच्या पत्नी व कुटुंबियांना २.५० लाखांची रुपयांची मुदत ठेव व २.५० लाख रुपयांचा रोख असा ०५ लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे.त्यांच्याकडे असणारे सोसायटीचे कर्ज,भाग व ठेव वजा जाता कर्ज माफ करण्यात आलेले आहे अशी घोषणा राज्य अध्यक्ष ढाकणे यांनी या ठिकाणी केलेली आहे.
ग्रामसेवक पतसंस्थेचे मार्फत वेळोवेळी सभासद कल्याण निधी अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून सभासद मयत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याची ग्रामसेवक परिवार कल्याण व्यवस्था हा निधी उपलब्ध करून देण्यात येतो.स्व.घारे यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी नुकतीच भेट दिली त्यावेळी ही घोषणा केली आहे.त्यावेळी त्यांनी ग्रामविकास अधिकारी घारे यांच्या अनेक स्मृती जागवल्या आहेत.व आदरांजली व्यक्त करून भविष्यात कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक याप्रसंगी पतसंस्थेचे रामदास पाटील डुबे,रमेश पाटील बांगर,कोपरगाव तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष गोरक्षनाथ शेळके,ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे,ग्रामसेवक सर्वश्री डी.बी.गायकवाड,बाळासाहेब आंबरे विभागीय सचिव जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य,संतोष रहाणे,रफिक सय्यद,ज्ञानेश्वर सुर्वे,विजय जोर्वेकर,आबा डमरे आदी मान्यवर ग्रामसेवक ग्रामस्थ उपस्थित होते.