जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिव कथाकार डॉ. दुशिंग यांचा कोकमठाणला शिवप्रेमींकडून गौरव

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोकमठाण येथील प. पू. ब्रम्हलीन रामदासी महाराज यांच्या ३० व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सुरु असलेल्या गाथा शिवशौर्याची या शिवचरित्र कथेचे गाढे अभ्यासक व झी टॉकीज फेम ह.भ.प. डॉ. प्रविण महाराज दुशिंग यांचा परिसरातील शिवप्रेमींकडून नुकताच गौरव करण्यात आला आहे.

प.पू.रामदासी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त यावर्षी ह. भ. प. डॉ. प्रविण महाराज दुशिंग यांची गाथा शिवशौर्याची ही कथा भव्य दिव्य जिवंत देखाव्यासह रोज रात्री ८ ते ११ या वेळेत भाविकांना ऐकायला मिळत आहे. डॉ. दुशिंग यांचे झी टॉकीजवर विविध कार्यक्रम झालेले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आठ दिवस हा पुण्यतिथी सोहळा सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची व शौर्याची गाथा ते स्वत: शिव चरित्र कथेमधून श्रोत्यांना सांगत आहेत. या निमित्ताने परिसरातील शिव किर्तनकार ,व्याख्याते प्रशांत टेके पाटील, शिव किर्तनकार , व्याख्याते अमोल बोरनारे, सतिश कासोटे, शेतकरी कृषी सेवा केंद्राचे संचालक जाकीर मन्सुरी यांच्यासह शिवप्रेमींनी त्यांचा सत्कार करुन ग्रामस्थंच्यावतीने गौरव केला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. दुशिंग यांनी हा गौरव केवळ माझा एकट्याचा नसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर निष्ठा असणार्या तमाम शिवप्रेमींचा असल्याचे सांगितले. यावेळी गायक अरुण पगारे, ह.भ. प.शंकर महाराज खैरनार, उत्तम महाराज गायकवाड, शाम शिंदे, अजित दोरगे, दिलीप खळदकर, छायाचित्रकार दीपक शिंदे तसेच पंचक्रोशीतील अनेक श्रोते व महिला उपस्थित मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close