जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अस्वच्छता करणाऱ्यां नागरिकांवर पालिका करणार कारवाई-वहाडणे

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव -(प्रतिनिधी)

शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षणा मध्ये सक्रीय सहभाग घेऊन शहर स्वच्छते मध्ये हातभार लावावा व नागरिकांनी रस्त्यावर कचरा केला असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नागरिकांविरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील सामाजिक अभिसरण व संस्थीय बांधणी घटका अंतर्गत ज्या गटांची स्थापना होऊन तीन महिने पूर्ण झालेत अशा गटांचे मुल्यांकन करून ज्या गटांना ५० पैकी ३० पेक्षा अधिक गुण प्राप्त झालेत अशा गटांना प्रती गट रु.१० हजार रुपयांप्रमाणे गटांच्या अंतर्गत गरजा भागविण्यासाठी खेळते भांडवल म्हणून एकूण ५८ गटांना रु.५ लाख ८० हजार एकत्रीत फिरता निधी मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला आहे.तसेच प्रधानमंत्री आवास योजने ज्या लाभार्थींचे घरकुल बांधकाम छतापर्यंत पूर्ण झालेलेआहे. अशा एकूण २११ लाभार्थ्यांना रु.वीस हजार प्रमाणे ४२ लाख २० हजार रुपयांचा निधी मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, शहर अभियान व्यवस्थापन कक्ष व संसाधन संस्था माविम कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी फिरता निधी वितरण आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील अंगीकार योजनेची कृतीसंगम कार्यशाळा ”मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष योगेश बागुल, नगरसेवक सत्येन मुंदडा,वर्षा शिंगाडे,सपना मोरे,प्रतिभा शिलेदार, तसेच कोपरगांव न.प.चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे ,शहर अभियंता दिगंबर वाघ,सहाय्यक जिल्हा समन्वयक मा.वि.म.अहमदनगर सुनिल पैठणे आदी अधिकारी,कर्मचारी व नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अंगीकार योजने बाबत मार्गदर्शन करतांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा कसा मिळू शकतो याबाबत मार्गदर्शन करताना स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये आपल्या शहराला मानांकन मिळण्यासाठी कुटुंबातील महिलांनी कशा प्रकारे सहभाग घ्यावा, कचरा विलगीकरण करून सेंद्रिय खत करण्यावर भर देण्यावर आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी दी.अं.यो-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे तांत्रिक तज्ञ महारुद्र गालट व रामनाथ जाधव, प्रधानमंत्री आवास योजनेचे विद्युत विभागाचे स्थापत्य अभियंता हर्षवर्धन सुराळकर,गणेश आहिरे, तसेच संसाधन संस्थेच्या लेखापाल सोनाली शिंदे, व्यवस्थापक सविता परदेशी, क्षेत्रीय समन्वयक हर्षा पाटील, सहयोगिनी गौरी जाधव, उषा पाटील, आदीनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले व उपस्थितांचे आभार अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close