कोपरगाव तालुका
महाविद्यालयीन तरुणी गायब,कोपरगावात तक्रार दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील एकोणाविस वर्षीय तरुणी नुकत्याच संपलेल्या वर्षाच्या शेवटी महाविद्यालयात जाते असे सांगून जे गेली ती पुन्हा परतलीच नसल्याची तक्रार या तरुणीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण आठ कि.मी अंतरावर गोदावरी काठी असलेल्या कुंभारी या गावात एक कुटुंब राहत असून घरात आई,मुलगा,व हरविलेली मुलगी असे एकत्र राहतात.गायब असलेली मुलगी हि ३१ डिसेंबर रोजी कोपरगाव येथील गोदावरी काठी असलेल्या के.जे.सोमय्या या महाविद्यालयात कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत होती.तिला रोज सकाळी महाविद्यालय असल्याने ती सकाळी आठ वाजेच्या राज्य परिवहन मंडळाच्या बसने ये-जा करत होती.मात्र ३१ डिसेंबर च्या दिवशी ती महाविद्यालयात जाते असे सांगून गेली व ती रोज महाविद्यालय सुटल्यावर तीन वाजता घरी परतते मात्र त्यादिवशी घरातून सात वाजता गेली ती परतलीच नाही.तिला घरच्या माणसांनी भ्रमणध्वनी केला असता तिने तो उचलला नाही.त्यावेळी आईने आपल्या मुलास त्या बाबत चौकशी करण्यास सांगितले असता त्याने कोपरगाव येथिल महाविद्यालय,नातेवाईक,मैत्रिणी यांच्याकडे चौकशी केली असता ती मिळून आली नाही.तिने अंगात काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट,काळ्या रंगाचे श्वेटर, त्यावर गुलाबी रंगाचे ठिबके, घातलेले आहे.तिची उंची पाच फूट असून पायात गुलाबी सॅंडल,उजव्या हातात घड्याळ घातलेले आहे.उजव्या हातावर काळ्या रंगाचा धागा असल्याची माहिती आहे.तरी कोणास आढल्यास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास खबर करावी असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी केले आहे.दरम्यान या घटनेने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.