जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील रखडलेले शेततळे अनुदान त्वरित द्या-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाअंतर्गत असलेल्या शेततळे योजनेचे अनुदान रखडले असून हे अनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषिमंत्री ना.दादा भुसे यांचेकडे केली आहे.

शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी “मागेल त्याला शेततळे” योजना घेण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर पिकांना पाणी देता यावे यासाठी शासनाकडून मागेल त्याला शेततळे योजना राबविली जात आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे.बहुतांशी शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळालेले आहे.मात्र २०१९-२० या वर्षातील ६९ लाभार्थी आजही शेततळ्याच्या अनुदानापासून वंचित आहेत.ही अनुदानाची एकूण रक्कम रुपये ३३ लाख ७६ हजार एवढी आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांपुढे काहीशा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सरकारने आजपर्यंत आलेल्या नैसर्गिक संकटाच्या वेळी झालेल्या नुकसानीची भरपाई बऱ्याच अंशी दिली आहे. मात्र २०१९-२० या वर्षात कोरोना साथीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आल्यामुळे शेततळ्याचे अनुदान रखडले आहे.वर्तमानात शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची तयारी करतांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे एकूण परिस्थितीचा विचार करून शेततळे योजनेचे रखडलेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी आ.काळे यांनी कृषिमंत्री ना.भुसे यांच्याकडे केली आहे.

सदर मागणीला कृषीमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून लवकरात लवकर शेततळे योजनेचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांना देणार असल्याचे आश्वासन आ.काळे यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close