कोपरगाव तालुका
राजकिय विरोधक म्हणजे शत्रू नव्हेत-नगराध्यक्ष
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यात राजकिय नेत्यांच्या आरोपप्रत्यारोपांचा अतिरेक सुरू आहे.रात्रंदिवस सर्व वृत्तपत्रे व सर्व चॅनेलवरील बातम्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने नविन पिढीमध्ये सर्वच राजकिय पक्ष-नेते व राजकारणाबद्दल अतिशय वाईट मत होत चालले आहे.त्यामुळे हे आरोप प्रत्यारोपांचे सत्र त्वरित थांबवावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“नविन पिढीमध्ये सर्वच राजकिय पक्ष-नेते व राजकारणाबद्दल अतिशय वाईट मत होत चालले आहे.राजकिय नेत्यांबद्दल जनतेत पराकोटीचे वाईट मत होणे फारच घातक आहे.असे होऊ नये यासाठी व नेते वैयक्तीक पातळीवर एकमेकांचे शत्रू होऊ नयेत यासाठी आपणलक्ष घालावे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर वर्तमानात हल्लाबोल सुरू असून भाजपाने त्याला जोरदार उत्तर दिले आहे.या आरोप प्रत्यारोपाने राज्याचे राजकीय विश्व ढवळून निघाले आहे.या पार्श्वभुमीवर कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नुतन ऑक्सिजन प्लान्ट व कोरोना हॉस्पिटलचा शुभारंभ ग्राम विकास मंत्री व पालक मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी ना.मुश्रीफ यांचेशी अनौपचारिक चर्चा करतांना हे आवाहन केले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”सध्या महाराष्ट्र राज्यात राजकिय नेत्यांच्या आरोपप्रत्यारोपांचा अतिरेक सुरू आहे.रात्रंदिवस सर्व वृत्तपत्रे व सर्व चॅनेलवरील बातम्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने नविन पिढीमध्ये सर्वच राजकिय पक्ष-नेते व राजकारणाबद्दल अतिशय वाईट मत होत चालले आहे.राजकिय नेत्यांबद्दल जनतेत पराकोटीचे वाईट मत होणे फारच घातक आहे.असे होऊ नये यासाठी व नेते वैयक्तीक पातळीवर एकमेकांचे शत्रू होऊ नयेत यासाठी आपणलक्ष घालावे कारण तुम्ही जेष्ठ मंत्री असल्याने आपणच या विषयात सर्व पक्षांमध्ये समन्वय करू शकता.वरीष्ठ नेत्यांचे एकमेकांवरील वैयक्तीक आरोप प्रत्यारोपांचे लोण गावागावात येणे
सामाजिक-राजकियदृष्टीने योग्य होणार नाही असे आवाहनही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.