जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना व साईनाथ रक्तपेढी,शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कोपरगाव येथील के.जे.सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.आर.पगारे यांच्या हस्ते झाले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.विजय ठाणगे,भूगोल विभाग प्रमुख डॉ.जी.के.चव्हाण व कार्यालय अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर रक्तदान शिबिरासाठी साईनाथ रक्तपेढी,शिर्डी या विभागाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुप्रिया सुंभ व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.बी.एस.गायकवाड,राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी डॉ.एन.जी.शिंदे ,५७ महाराष्ट्र बटालियन वियद्यार्थींनी विभागाचे अधिकारी प्रा.आहेर मॅडम व माजी कार्यक्रमाधिकारी डॉ.एस.के.बनसोडे त्यांनी विशेष श्रम घेतले.या शिबिरामध्ये एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे व संस्थेचे सचिव ॲड्.संजीव कुलकर्णी यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close