कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात …या परिसरात विद्युत पंपांच्या चोऱ्यांत वाढ
December 28, 2019
441 Less than a minute
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत व परिसरात विद्युत पंप व त्याच्याशी संलग्न,केबल, स्टाॅटर आदी वस्तूंच्या चोऱ्यांत मोठी वाढ झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.त्यामुळे जेऊर कुंभारी गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी कोपरगाव शहर ठाण्यात निवेदन देऊन चोरांचा तपास लावून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.
चालू हंगामात पर्जन्यमान चांगले झाले असून रब्बी पिकांची पेरणी बऱ्यापैकी झाली असून आता उभारलेल्या पिकांना पाणी देण्याची शेतकाऱ्यांची लगबग सुरु झाली आहे.एकतर महावितरण कंपनी दिवसा वीज देत नाही.रात्री देते त्यात शेतकऱ्यास मोठी जोखीम असते.कधी हि वीज रात्री तर कधी दिवसा असते मात्र चोरटे बरोबर या वेळा हेरून शेतकरी आज शेतात नाही अशा वेळेस येऊन आपला हात साफ करत आहे.त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांची त्रेधातीरपट होत असून ऐन आर्थिक टंचाईच्या काळात हा फटका सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे.
या बाबत जेऊर कुंभारी येथील ,भिमराज मच्छिंद्र वक्ते, शामराव कल्याण वक्ते, बाळासाहेब चंद्रभान वक्ते, सोपानराव पोपट वक्ते , लक्ष्मण मच्छिंद्र वक्ते, पाटील बाबा वक्ते, जांलिदर रावसाहेब चव्हाण, राजेंद्र विश्वास वक्ते, भानुदासं शामराव वक्ते, किरण पाटील वक्ते, संजय शांतीलाल वक्ते, राजेंद्र केशव गिरमे,डाॅ. कुलकर्णी, या सर्व शेतक-यांच्या विद्युत पंप, केबल, चोरीला जात आहे.गेल्या तिन वर्षे पासुन चोरट्यानीं आपली हात कि सफाई दाखविण्याचे काम सुरु ठेवल्याने शेतकरी हैराण झाले आहे. या चोऱ्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे.याबाबत पोलिसांनी या चोरट्यांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचेकडे केली आहे.