जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावला शेती सिंचनासाठी शाश्वत पाणी द्या- आ. आशुतोष काळे 

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा पर्जन्यछायेखाली येत असल्यामुळे संपूर्ण मतदार संघात नेहमीच पाऊस कमी पडतो.मागील काही वर्षांपासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी जायकवाडीला जात आहे. त्यामुळे मतदार संघातील शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असून कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनुत्तरित आहे. आपण व्यक्तिगत लक्ष घालून कोपरगाव मतदारसंघासाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत उपाय योजना कराव्या अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुंबई येथे शरद पवारांच्या निवासस्थानी केली आहे.

आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे. गोदावरी खोरे हे अतीतुटीचे असूनही नगर, नाशिकच्या धरणातून अनेकवेळा जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्यामुळे अहमदनगर, नाशिक व मराठवाडा असा प्रादेशिक वाद निर्माण झालेला आहे. हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी पूर्ववत मिळण्यासाठी पावसाळ्यात पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे ८० टीएमसी पेक्षा जास्त पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राज्य शासनाला तातडीने निधीची उपलब्धता करण्यासाठी योग्य त्या सूचना कराव्या असे आ. आशुतोष काळे या पावसाळ्यात पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे ८० टीएमसी पेक्षा जास्त पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविण्या संदर्भात आ. आशुतोष काळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या नागपूर अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी पवारांच्या घेतलेल्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close