जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उच्च शिक्षणातील गळती रोखण्यासाठी आदिवासी विभाग प्रयत्नशील – डॉ. कुलकर्णी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आदिवासीच्या मुलामध्ये प्राथमीक,माध्यमिक शिक्षणाची रुची वाढली तरीही उच्चशिक्षणात गळती आहे. उच्चशिक्षणातील गळती रोखण्यासाठी आदिवासी विभाग विषेश प्रयत्न करीत आहे असे मनोगत महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान इयत्ता १२वीत शिक्षण घेणा-या मुलांच्या अभ्यास व करियर मार्गदर्शन शिबीरामध्ये राज्यातील आदिवाशी विभागाच्या नाशिक, अमरावती पालघर रामटेक नंदुरबार गडचिरोली धुळे या विभागातील एकलव्य निवासी शाळेच्या तीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता या विद्यार्थ्यांना बारावी सायन्सचा अभ्यास कसा करावा बारावीनंतर नोकरी आणि व्यवसायाच्या संधी या विविध विषयावर तीन दिवसांमध्ये चारुदत्त गोखले, अजय कुलकर्णी ,संजीवनी दामले, कामिनी थावराजी, शशिकांत नंदगिरवार, डॉ.श्वेता कुलकर्णी, प्रा. सुधाकर मलिक, माणिकराव जाधव, नामदेव डांगे, कांतीलाल पटेल, शंकर दुपारगुडे या तज्ञांनी मार्गदर्शन केले.तर आदिवासी विभागाच्या शिक्षकांच्या पाच दिवशीय कार्यशाळेत आधूनिक प्रशिक्षणाचे धडे प्रात्येक्षिकातून देण्यात आले.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालीक ध्यानपिठ व शैक्षणीक क्रिडा संकुलात राज्यातील आदिवासी विभागाच्या एकलव्य निवासी शाळेच्या इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांचे तिन दिवसिय अभ्यास शिबीर व या मुलांना शिकवणा-या शिक्षकांचे पाच दिवसाच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन नूकतेच करण्यात आले होते. शिबीराच्या सांगता समारंभा प्रसंगी कुलकर्णी बोलत होते.

यावेळी आत्मामालीक ध्यानपिठाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक चे संचालक प्रकाश आंधळे, आत्मा मालीक ध्यानपिठाचे विवेकानंद महाराज, निजानंद महाराज, विश्वस्त विष्णुपंत पवार, डॉ.श्वेता कुलकर्णी, राजश्री कुलकर्णी,प्राचार्य सुधाकर मलीक,माणिकराव जाधव, मंत्रालय प्रतिनिधी सिध्दी मेहता,सुनिता खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ.किरण कुलकर्णी पुढे म्हणाले की, व्यक्ती उच्च शिक्षणाने एक पायरी चढतो त्यामुळे त्यांच्या जीवनाची उंची वाढून दुरदृष्टी निर्माण होते त्यातून आदिवासींच्या मुलांना जीवनाचा मार्ग सापडतो.आदिवासींच्या मुलांना उच्चशिक्षणात मदत करुन नवा इतिहास घडवायचा आहे. आत्मा मालीक येथे आदिवासींच्या मुलांसाठी शिक्षण,कला,क्रिडा,ध्यान आध्यात्माच्या शिकवणीतून चांगले कार्य केले जात आहे हे आपण ऐकुण होतो मात्र आज प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्याची मलाही अनुभुती आली. असेही शेवटी ते म्हणाले. यावेळी संत विवेकानंद महाराज यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य टी कलाथीनाथन यांनी केले तर प्रकाश आंधळे यांनी विद्यार्थी शिक्षक यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले

या शिबीरार्थींची संपुर्ण निवास,भोजनाची व्यवस्था आत्मामालीक ध्यानपिठात करण्यात आली होती. हे शिबीर यशस्वीतेसाठी आश्रमाचे विश्वस्त प्रकाश भट्ट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, योगेश गायके,नितीन शिंदे यांच्यासह विविध विभागाचे शिक्षक,शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close