जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावात भूगोल विषयावर मार्गदर्शन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील के.जे.सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भूगोल विभाग व अंतर्गत गुणवता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ मध्ये येणार्‍या जनगणेचे औचित्य साधून “जनगणना माहिती व भूगोलातील संशोधन” या विषयावर नुकतेच एस.एन.डी.टी.विद्यापीठाच्या व्याख्यात्या डॉ.रत्नप्रभा जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.त्याला मोठा प्रतिसाद लाभला आहे.

एखाद्या राष्ट्राच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांची मोजणी.आधुनिक काळात प्रत्येक राष्ट्रातील शासनाचे हे एक अटळ कर्तव्य झाले आहे.राष्ट्राची लोकसंख्या किती,त्यातील लोकांची सामाजिक व आर्थिक वैशिष्ट्ये कोणती,त्यांचे राष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत वितरण कसे झाले आहे.सामाजिक व जीवशास्त्रीय फेरफारांचे त्यांच्यावर कसकसे परिणाम होतात आदी अनेक प्रश्न दैनंदिन प्रशासनासाठी महत्त्वाचे हाताळण्यासाठी आवश्यक असलेली माहिती जनगणनेद्वारा उपलब्ध होते.त्यासाठी हे व्याख्यान कोपरगावात आयोजित करण्यात आले होते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,एखाद्या राष्ट्राच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांची मोजणी.आधुनिक काळात प्रत्येक राष्ट्रातील शासनाचे हे एक अटळ कर्तव्य झाले आहे.राष्ट्राची लोकसंख्या किती,त्यातील लोकांची सामाजिक व आर्थिक वैशिष्ट्ये कोणती,त्यांचे राष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत वितरण कसे झाले आहे.सामाजिक व जीवशास्त्रीय फेरफारांचे त्यांच्यावर कसकसे परिणाम होतात आदी अनेक प्रश्न दैनंदिन प्रशासनासाठी महत्त्वाचे हाताळण्यासाठी आवश्यक असलेली माहिती जनगणनेद्वारा उपलब्ध होते.शासनाला केवळ जनगणनाच नव्हे,तर इतर अनेक प्रकारच्या गणना कराव्या लागतात.उदा., कृषिगणना,पशुधनगणना,उत्पादनगणना,घरांची मोजणी इत्यादी.अशा सर्व गणनांतून उपलब्ध होणारी आकडेवारी राष्ट्रीय प्रगती दर्शविते व राष्ट्राच्या अनेक समस्यांचा उलगडा करण्यास उपयोगी पडते.वर्तमानात भारतात ती होणार असल्याने त्यावर कोपरगाव येथील व्याख्यानात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.देशाची जणजगणना सन-२०११ साली झाली होती.ती दर दहा वर्षांनी होत असते.या पार्श्वभूमीवर कोपरगावात भूगोल संशोधनात मोठे योगदान असललेल्या पुणे येथील एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठातील भूगोल विभाग प्रमुख डॉ.रत्नप्रभा जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी त्या मार्गदर्शनक करत होत्या.

सदर व्याख्यानात त्यांनी भारतीय जनगणना त्याचा इतिहास आणि येणारी २०२१ ची जनगणना व त्यात झालेले अद्यावत बदल तसेच ऑनलाइन जनगणनेचे स्वरूप व या महितीचे भूगोल संशोधनात होणारे उपयोग या बद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.त्याच प्रमाणे विद्यार्थ्यानी आपला संशोधात्मक दृष्टीकोण कसा वाढवावा व संशोधनात जनगणनेच महत्व याबद्दल ऑनलाइन मार्गदर्शन केले आहे.

या व्याख्यानास के.जे.सोमैया महाविद्यालयामधील विद्यार्थी,संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक असे एकूण ६२ व्यक्तींनी सहभाग नोंदवला आहे.या व्याख्यानामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले आहे.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ.गणेश चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.लीना त्रिभुवन यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.वसुदेव साळुंके यांनी मानले आहेत

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.संतोष पगारे,महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षेचे समन्वयक प्रा.विजय ठाणगे,कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे तसेच भूगोल विभागचे प्रा.आकाश सोनवणे,प्रा.राजेंद्र पवार,प्रा.संतोष आहेर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close