जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ग्राहकांना समाधान देणारी प्रामाणिक सेवा महत्वाची- डॉ.संजय देवकर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव (प्रतिनिधी)

प्रत्येकाने सेवा देतांना ग्राहकांचे समाधान महत्वाचे असून दिलेले सेवेतून प्रामाणिक पणा महत्त्वाचा असल्याचे मत ग्राहक मंचचे सदस्य डॉ. संजय देवकर यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
कोपरगाव तहसिल कार्यालयाच्या वतीने ३३ वा राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी ग्राहक मंचचे सदस्य डॉ. संजय देवकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार योगेश चंद्रे होते.

राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते.ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.

ग्राहकांना आपल्या सुरक्षेचा हक्क,माहितीचा हक्क,निवड करण्याचा अधिकार,म्हणणे मांडण्याचा हक्क,तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क,ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार हे अधिकार ग्राहकांना समजण्यासाठी ग्राहक दिन साजरा करण्यात येत असतो.कोपरगाव तहसील कार्यालयात तो सालाबादप्रमाणे या वर्षी साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

त्यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शासनामार्फत मिळणाऱ्या विविध सेवा आणि नागरिकांना सुविधा देणार्या आवश्यक सर्व विषयावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी वनक्षेत्र अधिकारी संतोष जाधव,उपमुख्याधिकारी संजय गोर्डे, वीज वितरणचे उप अभियंता अतुल खंडारे,संदिप जवाहर,दुय्यम निबंधक बालाजी माडस्वार,यांचे सह लक्ष्मण साबळे,सुखदेव जाधव,बाळासाहेब दिक्षित,अमन मनियार,पप्पु बागुल आदिंसह नागरिक उपस्थित होते.उपस्थितांचे आभार पुरवठा निरिक्षक सचिन बिन्नोड,बोगिर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close