जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात राष्ट्रवादीने इंधन दरवाढी विरोधात फुंकले रणशिंग !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडले असून त्या निषेधार्थ कोपरगाव तालुका राष्ट्रवादीच्या वतीने दि.२० ऑक्टोबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

पेट्रोल-डिझेल दर यावेळी सर्वात उचांकी स्तरावर आहेत.आय.ओ.सी.एल.च्या आज जारी झालेल्या रेटनुसार,दिल्लीत इंडियन ऑइल पंपवर पेट्रोलची १०५.८४ रुपये प्रति लीटरने विक्री होत आहे.तर डिझेलची ९४.५७ रुपये प्रति लीटरच्या दराने विक्री होत आहे.त्यामुळे जनतेत अच्छि-खांशी नाराजी पसरली आहे.त्यामुळे वाहतुकदारांनी संपाची तयारी चालवली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगावात राष्ट्रवादीने हे सायकल फेरी काढण्याचे ठरवले आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. अनेक दिवसांनंतर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दर स्थिर आहे. याआधी सोमवारीही पेट्रोल-डिझेल दर स्थिर होते. पेट्रोल-डिझेल दरात रविवारी ३५.३५ पैसे प्रति लीटरची वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेल दर यावेळी सर्वात उचांकी स्तरावर आहेत.आय.ओ.सी.एल.च्या आज जारी झालेल्या रेटनुसार,दिल्लीत इंडियन ऑइल पंपवर पेट्रोलची १०५.८४ रुपये प्रति लीटरने विक्री होत आहे.तर डिझेलची ९४.५७ रुपये प्रति लीटरच्या दराने विक्री होत आहे.त्यामुळे जनतेत अच्छि-खांशी नाराजी पसरली आहे.त्यामुळे वाहतुकदारांनी संपाची तयारी चालवली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगावात राष्ट्रवादीने हे सायकल फेरी काढण्याचे ठरवले आहे.

या इंधन महागाईमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहे.त्याची त्यांना झळ बसत असून स्वयंपाकाच्या गॅसचे दर देखील गगनाला भिडले असून महिलाचे आर्थिक अंदाजपत्रक कोलमडले आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे.

याबाबत केंद्र सरकार मुग गिळून गप्प बसले आहे.सर्वसामान्य नागरिकांना होत असललेल्या त्रासाची केंद्र सरकारचकार शब्द काढायला तयार नाही.त्या निषेधार्थ केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी दि.२० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सायकल फेरी काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी या फेरीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close