कोपरगाव तालुका
वाळू चोरीचे दोन ट्रॅक्टर पकडले,तहसीलदारांची कारवाई !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करण्यास प्रतिबंध असतानाही आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा बळी देणाऱ्या जेऊर पाटोदा येथील वाळूचोरां विरुद्ध कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी कारवाईचा बडगा उगारला असून तेथील विना क्रमांकाच्या एका महिंद्रा कंपनीच्या लाल रंगाचा ट्रॅक्टर त्यांनी नुकताच जप्त केला असून त्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित असून त्या ट्रॅक्टरची माहिती विभागीय परिवहन अधिकाऱ्यांकडून मागवली आहे.तर दुसरी कारवाई काल सकाळी वारी ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आली असून तेथील अवैध वाळू उपसा प्रतिबंधक पथकातील सदस्य तथा कामगार तलाठी श्री भांगरे व कोतवाल श्री माळवदे यांनी (एम.एच.१५ ए. एम.७२३५ ) या ट्रॅक्टर कारवाईसाठी ताब्यात घेतला आहे.
दोन्ही ट्रॅक्टरमध्ये प्रत्येकी एक ब्रास वाळू या पथकाला आढळून आली होती.जेऊर पाटोदा येथील वाहन हे तेथील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे असल्याची पक्की खबर मिळाल्याने महसूल विभाग काय कारवाई करणार कि मागीलप्रमाणे पुन्हा वाळूचोरांना अभय मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या कारवाईने या परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातून गोदावरी नदी वहाते. या नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकारी यांची सक्त बंदी असूनही मात्र वाळूचे भाव आकाशाला भिडल्याने सध्या वाळूचोर कोणत्याही स्तराला जाण्याच्या तयारीत आहे.गोदावरी नदीला सध्या पाणी असूनही वाळूचोर वाळू उपसा करण्यासाठी नाना क्लुप्त्या वापरत आहे.यातून गत उन्हाळ्यात वाळूची निविदा राजकीय नेत्याने एका कार्यकर्त्यांच्या आश्रयाने व नावाखाली घेण्यात आल्याने त्यात मर्यादा ओलांडून प्रचंड म्हणजे दोनशे कोटींचा एकावेळी दहा वर्षाचा वाळू उपसा करण्यात आल्याने नदीपात्र उजाड झाले आहे.त्यामुळे आगामी काळात पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.मात्र याची चिंता ना राजकीय पुढाऱ्यांना ना अधिकाऱ्यांना.या बाबत माजी खा.शंकरराव काळे यांनी उच्च न्यायालयातून या वाळू उपशाला स्थगिती मिळवली होती मात्र वाळूचोरांचा उच्छाद पाहता त्यांनी शासनाचा महसूल बुडत असल्यानेच अखेर हि स्थगिती शेवटच्या कालखंडात उठवली होती.तो पासून आता वाळूउपशाला कुठलाही धरबंध राहिलेला नाही.आता तर या व्यवसायात पांढरपेशे पुढारी उतरले असल्याने वाळूचोरांना “भीती” नावाची कुठलीही चीज राहिलेली नाही.थेट वाळूचोरांच्या बैठक तहसील कार्यालयात झाल्याने या वाळूचोरांना थेट राजकीय अभय मिळाल्याचे वाटत आहे.त्यासाठी आता महसूल व पोलीस विभागाला या बाबत सतर्क व्हावे लागणार आहे.नवीन तहसीलदार योगेश चंद्रे व विधानसभा निवडणुकीत नवीन नेतृत्व म्हणून आ. आशुतोष काळे हे आल्याने आता तरी या वातावरणात बदल होईल अशी आशा नागरिकांना वाटत आहे.