कोपरगाव तालुका
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात वृक्ष लागवड
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयांत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा वाढदिवस वृक्ष लागवड,रक्तदान शिबिर,आदी उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची देशाच्या राजकारणातील एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळख आहे.त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चार वेळा जबाबदारी सांभाळली आहे.देशाचे पंधरा वर्ष कृषिमंत्रिपद,संरक्षण मंत्री,आदी पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळले.राज्यात आजही ते अनेक क्षेत्रात कार्यरत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते १९९८ साली संस्थापक बनले.आज राज्यात तीन पक्षांच्या सरकारचे ते किंग मेकर ठरले आहे.त्यांचा वाढदिवस कोपरगावात श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.त्यावेळी राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.डॉ.जहांगीर होमी भाभा प्रांगणा समोरील मैदान,गोल बाग, कनिष्ठ विभाग आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय व संजीवनी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर राबविण्यात आले त्यावेळी १०० रक्तदात्यांनी त्यात सहभाग घेतला आहे.
सदर प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दिलीप दारुणकर,सुनील गंगूले,एरंडोल शासकीय तंत्र विद्यालयाचे प्राचार्य श्री राजपूत,प्रा.महाजन, प्रा.पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.झरेकर, डॉ.आर.जी.पवार,डॉ.व्हि. बी.निकम,प्रा.डी. डी. सोनवणे,सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.कैलास महाले,डॉ.सुरेश काळे,राष्ट्रीय छात्रसेनेचे कप्तान डॉ.चौधरी, प्रा.शोभा दिघे,कमवा व शिका योजनेचे प्रमुख डॉ.आर.डी. कानडे,प्रा. एस.पी.हाडुळे,प्रा.अमोल चंदनशिवे,कार्यालयीन अधीक्षक वसंत पवार,एस.के.पवार.संदीप वाघचौरे,अमन तांबोळी, आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.