कोपरगाव तालुका
कोपरगाव शहरासाठी नवीन डी.पी.आर.तयार करा-या पक्षाची मागणी
न्यूजसेवा
कोपरगावं(प्रतिनिधी)
शहरातील अनेक नागरिकांना हक्कांच्या घराचा लाभ मिळालेला नसून हे नागरिक आजही घरापसुन वंचित आहेत.अशा बेघर नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने डी.पी.आर. तयार करावा अशा आशयाच्या सूचनांचे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादीच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना नुकतेच दिले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या दोन पॆक्षा कमी महिन्यावर येऊन ठेपली असताना वर्तमानात अनेक राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्याना जनतेचा कळवळा येताना दिसत आहे.गत पाच वर्ष केवळ शिमगा खेळणाऱ्या या राजकीय पक्षांना व नेत्याना शहरातील जनता ओळखून आहे.तरीही त्यांचा एकदा मते दिली की पाच वर्ष त्यांच्या हातात काहीही राहत नसल्याने हा राजकीय खेळ पहाण्यापलिकडे मतदारांच्या हाती काही राहत नाही याचाच फायदा वर्तमान राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते घेताना दिसत आहे.
हक्काचे घर असावे ही सर्वांचीच ईच्छा आहे.परंतु आर्थिक परिस्थितीमुळे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही.यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही हक्काचे घरकुल मिळवून देणारी योजना असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरकुल योजना राबविणे आवश्यक असल्यामुळे भविष्यातील घरकुल योजनांचे नियोजन करण्यात आले आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांमध्ये पती, पत्नी व अविवाहीत मुलांचा समावेश असून लाभार्थी कुटुंबांजवळ त्याच्या नावावर अथवा त्याच्या कुटुंबांमध्ये कोणत्याही सदस्याच्या नावे देशाच्या कुठल्याही भागामध्ये पक्के घर नसलेल्या व्यक्तीचा समावेश राहणार आहे. या इमारतीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांकरिता ३०.०० चौ.मि. व अल्प उत्पन्न गटातील लोकांकरिता ६०.०० चौ.मि.चे चटई क्षेत्रफळ आहेत.यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न तीन लक्ष रुपयाच्या आत व अल्प उत्पन्न गटातील वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लक्ष रुपयाच्या आत असणे आवश्यक आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या दोन पॆक्षा कमी महिन्यावर येऊन ठेपली असताना वर्तमानात अनेक राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्याना जनतेचा कळवळा येताना दिसत आहे.गत पाच वर्ष केवळ शिमगा खेळणाऱ्या या राजकीय पक्षांना व नेत्याना शहरातील जनता ओळखून आहे.तरीही त्यांचा एकदा मते दिली की पाच वर्ष त्यांच्या हातात काहीही राहत नसल्याने हा राजकीय खेळ पहाण्यापलिकडे मतदारांच्या हाती काही राहत नाही याचाच फायदा वर्तमान राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते घेताना दिसत आहे.वर्तमानात राष्ट्रवादी पक्षाने नुकतीच अशीच मागणी करून यास दुजोरा दिला आहे.
राज्यातील बेघर नागरिकांना आपली हक्काची घरे मिळावी अशी सामान्य नागरिकांची इच्छा असते तरीही प्रत्यक्षात या योजना मंजुर होऊनही त्याची विल्हेवाट लावली जाते.कोपरगावात या पूर्वी २०१०-११ मध्ये शंभर कोटींची योजना येऊनही केवळ राजकीय कुरघोड्यामुळे तो मोठा निधी या पूर्वी परत गेला आहे.तरीही यावरील राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही हेच खरे आहे.अशा नागरिकांना तातडीने सर्व्हे करावा.बेघर असणाऱ्या कुटुंबांची नोंदणी करून आवास योजनेच्या नियमात या कुटुंबांना बसविण्यासाठी आय.एस.एस.आर.,सी.एल.एस.आय.,ए.एच.पी.,बी.एल.सी. या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून बेघर असणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी डीपीआर तयार करा.ज्या नागरिकांना जागेची अडचण आहे त्या नागरिकांसाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर अॅफार्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट तयार करून बेघर नागरिकांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पाहणी करून डीपीआर तयार करावा. अशी पिपाणी वाजली आहे.तसेच कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या ठिकाणी बेघर असणाऱ्या कुटुंबाना घरे देण्यासाठी प्रस्ताव तयार करा.
बेघर असणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू असेहि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व नगरसेवक यांनी म्हटले आहे. निवडेनाची प्रत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिली आहे.
या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,प्रतिभा शिलेदार,वर्षा शिंगाडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविदर दडीयाल,गौतम बँकेचे संचालक सुनिल शिलेदार,राजेंद्र वाघचौरे,कृष्णा आढाव,फकीर कुरेशी,विजय त्रिभुवन,रमेश गवळी आदि मान्यवर उपस्थित होते.