जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात गोदावरी महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी व समता महिला बचत गट कोपरगाव आयोजित महिला बचत गट व गृहउद्योग उत्पादित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नुकताच आयोजित करण्यात आलेला ‘गोदावरी महोत्सव २०२१’ चा सांगता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे.

भीमथडी जत्रेत कालांश राजगिरा लाडू आणि चिक्की कोपरगाव, बोरडी महिला बचत गट बोराडी,समता महिला बचत गट कोपरगाव,माऊली गृहउद्योग शिंगणापूर,ओम साई उद्योग संवत्सर,साईप्रसाद पापड उद्योग जेऊर पाटोदा या कोपरगाव तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांची निवड करण्यात आली तर खुलताबाद येथील राणी लक्ष्मीबाई बचत गटाची निवड झाली आहे त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना ओमप्रकाश कोयटे म्हणाले कि,‘कोरोना काळात अनेकांचा व्यवसाय बुडाला,नोकऱ्या गेल्याने बेरोजगार तरुणाई व बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना एक नवीन बाजारपेठ व विक्रीचे ठिकाण उपलब्ध करून देण्याच्या विचारातून ‘गोदावरी महोत्सव २०२१’ चे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाला कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील आणि तालुक्याबाहेरीलही महिला बचत गटांनी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने गोदावरी महोत्सव कोपरगाव पुरताच मर्यादित न राहता महाराष्ट्रातील अनेक जिल्हे मिळून महोत्सवाचे आयोजन केल्याने सहकार उद्यमीचा महिला बचत गट व गृह उद्योग उत्पादित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश पूर्णत्वास जाईल.तसेच यामुळे महाराष्ट्रातील महिला बचत गटांच्या व्यवसायात प्रगती होऊन त्यांची आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल सुरु झाली आहे.कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गटांच्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी उद्योग मंदिराचे उद्घाटन करून हक्काची जागा उपलब्ध करून दिली आहे.या संधीचा फायदा कोपरगाव तालुक्यातीलच नव्हे,तर राज्यातील सर्वच महिला बचत गटांनी घ्यावा.

समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे,समता नागरी पतसंस्थेचे संचालक अरविंद पटेल,चांगदेव शिरोडे,व्यापारी अशोक दरक,कृष्णाई मंगल कार्यालयाचे मालक चंद्रशेखर देशमुख,साई आश्रयाचे व्यवस्थापक गणेश दळवी,मार्केटिंग तज्ञ कमलेश कोते,शार्प इंजिनीअरिंगचे मालक रविराज भालेराव,सविता विधाते आदि मान्यवर गोदावरी महोस्तव २०२१ च्या सांगता प्रसंगी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांपैकी मार्केटिंग तज्ञ कमलेश कोते, शार्प इंजिनिअरिंगचे मालक रविराज भालेराव, कालांश उद्योग समुहाचे रोहित काले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.

प्रसंगी स्मॉल मशिनरी एक्स्पो चे माध्यमातून छोट्या मोठ्या ६० मशिनरींचे प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध होत्या तर समता महिला बचत गटासह कोपरगाव तालुक्यातील ७० स्टॉल व तालुक्याबाहेरील २५ स्टॉलच्या माध्यमातून ९५ स्टॉलसह प्रदर्शन व विक्रीचा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार उद्यमीच्या पदाधिकारी,समता महिला बचत गटाच्या महिला, शार्प इंजिनिअरिंग वर्क्सचे कर्मचारी,टॅबलॅब टेक्नोलॉजीचे कर्मचारी आदिंनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समता महिला बचत गटाच्या रेणुका मुन्शी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अगरबत्ती विभागाचे प्रदीप वैद्य यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close