कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात श्री गणेश विसर्जन उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत व तालुक्यात आज अनंत चतुर्थी दिनी दहा दिवस मुक्काम केल्यानंतर कोरोनाचे नियम पाळत आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जात आहे.पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जात आहे.मात्र,कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच करावा लागत असल्याने गणेश भक्तांचा काहीसा हिरमोड झालेला पहायला मिळाला आहे.निदान पुढील वर्षी तरी बाप्पाने हि स्थिती टाळावी अशी अपेक्षा करत गणेशोत्सव संपन्न झाला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेने जागोजागी व्यवस्था करून नागरिकांना गोदावरी प्रदूषण करण्यापासून रोखले असले तरी पवित्र गोदावरीत संपूर्ण शहराची गटार गंगा सोडून गणपतीचे प्रदूषण टाळण्याची कृती हि,”दरवाजा सताड उघडा आणि मोरीला बोळा” घालण्याची कृती ठरली असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकानी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे.
यावर्षीही गत वर्षी प्रमाणे कोरोना नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच करावा लागत असल्याने गणेश भक्तांचा काहीसा हिरमोड झालेला पहायला मिळाला.किमान पुढच्या वर्षीतरी अशी परिस्थिती नसावी असच मागणं यंदा बाप्पाकडे गेलं आहे.दरम्यान,कोपरगावसह तालुक्यात घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे.कोपरगाव शहर आणि तालुकाही त्याला अपवाद नाही.
सदर प्रसंगी नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी व पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपरिषद आणि पोलिस प्रशासन यांनी नियोजन करून गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन केले आहे.तर गोदावरी नदीपात्राची स्वच्छता ठेवण्यासाठी झगडणारे गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे,लायन्स क्लब के.जे.सोमय्या महाविद्यालयाचे प्राध्यापक,विद्यार्थी व त्यांचे सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
अनेकांनी कृत्रिम आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने फिरते सात संकलन केंद्राला प्राधान्य दिलं असलं तरी कोपरगाव नगरपरिषदेने जागोजागी व्यवस्था करून नागरिकांना गोदावरी प्रदूषण करण्यापासून रोखले असले तरी पवित्र गोदावरीत संपूर्ण शहराची गटार गंगा सोडून गणपतीचे प्रदूषण टाळण्याची कृती हि,”दरवाजा सताड उघडा आणि मोरीला बोळा” घालण्याची कृती ठरली असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकानी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे.तालुक्यातील साखर कारखानदार आणि औद्योगिक वसाहत,पालिका आदींनी सोडलेल्या पाण्याने गोदावरी नदीपात्रात मासे जिवंत राहू शकत नाही हि वस्तुस्थिती असून खाली जायकवाडीत पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अनेक वेळा अहवाल जलप्रदूषण मंडळाने दिले आहे हे विशेष ! मात्र यावर सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते सोयीस्कर गुपचीळी धारण करतात.याला काय म्हणायचे ?
शहरातील नागरिकांचे विसर्जन करण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी शहरातील विविध भागातील मुख्य सात ठिकाणी श्री गणेश मूर्ती विसर्जन रथ उभारणी करण्यात आले होते.सर्व रथ नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी आकर्षक पद्धतीने सजविले होते.कोरोनाविषयक कोणतेही नियम न मोडता नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना कोणतीच गैरसोय होऊ नये याकरिता दिवसभर मुर्त्यांचे संकलन केले.तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गर्शनाखाली याप्रत्येक समिती सोबत दोन पोलिस अधिकारी कर्मचारी पोलिस प्रशासाने दिले होते.
संध्याकाळी ६ वाजता सर्व गणेशमूर्तींचे गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली सर्व प्रशासनाने विसर्जन केले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.स्वतः नगराध्यक्षांनी शहरातील सर्व गणेश विसर्जन ठिकाणांची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियोजित काम करण्यासंदर्भात सूचना दिल्या असल्याचे दिसून आले आहे.या कामी सर्व ठेकेदार यांनी तात्काळ आपले ट्रॅक्टर्स जेसीबी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे.
शहरातील सर्व गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर “एक गाव एक गणपती” श्री गणेशाचे विसर्जन थाटामाटात उत्साहाच्या वातावरणात नगरपरिषद प्रशासन,पोलीस प्रशासन सर्व नागरिक,सर्व पदाधिकारी यांच्यावतीने उशिरा करण्यात आले आहे.