जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील…’त्या’ दरोड्यातील मुद्देमाल फिर्यादिस परत

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील ओगदी ग्रामपंचायत हद्दीत दि.०९ जानेवारी रोजी पहाटे १.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात तीन दरोडेखोरांनी कमलबाई लक्ष्मण जोरवर (वय-४५) यांचे वस्तीवर दरोडा दरवाजावर दगडांचा भडिमार करून तो तोडला व घरातील ५० हजार रुपये रोख,जवळपास सहा तोळे सोन्या-चांदीचे विविध दागिने असा ३ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला असून महिलेला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्या प्रकरणातील आरोपी कोपरगाव तालुका पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडील सुमारे १७ ग्राम सोन्याचे,२५० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करून तो मुद्देमाल नुकताच न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी कुटुंबाच्या ताब्यात दिला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी तपासाची सूत्रे फिरवून आरोपी सचिन उर्फ संजय उर्फ बोग्या सखाहारी चव्हाण (वय-२८),सचिन विरुपन भोसले,या दोघाना अटक केली होती तर तिसरा आरोपी संकेत मेहंद्या उर्फ महेंद्र चव्हाण हा मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाला होता.दरम्यान या गुंह्यातील मुद्देमालापैकी १६ तोळे ९०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व २५० ग्रॅम वजनाची चांदीची लगड ताब्यात मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले होते.तो मुद्देमाल नुकताच फिर्यादीस परत दिला आहे.या प्रकरणी पोलिसांचे कौतुक होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील ओगदी हे खेडे तालुक्याच्या व जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असून या भागात मोठ्या दळणवळणाची मोठी वानवा आहे.याच गावात फिर्यादी महिला कमलबाई जोरवर व त्यांचे कुटुंब आपल्या सर्व सदस्यासोबत राहाते.त्यांच्यावर दि.०९ जानेवारी रोजी रात्री ते आपली नेहमीची शेतीची कामे आटोपून व घराचे दरवाजाचे आतून बंद करून झोपी गेले असता त्यांच्या घरावर आज पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यानी घरावर हल्लाबोल केला.

आधी त्यांनी या कुटुंबातील सदस्यांनी धाक दाखवून त्यांना दरवाजा उघडण्यास सांगून तसा प्रयत्न केला असता त्यांनी दाद दिली नाही त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या लाकडी दरवाजावर मोठमोठाले दगड घालून दरवाजा तोडला व घरातील रोख पन्नास हजारांची रोख रक्कम त्यात (२०००,५००,१०० दराच्या नोटा),६० हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे नेकलेस,६० हजार रुपये किमतीचा दीड तोळे वजनाचा एक दाणी सर,५० हजार रुपयांची सव्वा तोळे वजनाची सोन्याची पोत,३० हजार रुपये किमतीच्या ५०० ग्राम वजनाच्या चांदीच्या बाहुल्या,६० हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याची सोन्याची पोत,०४ हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे ओम पान,०४ रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,असा एकूण ०३ लाख १८ हजार रुपये किमतीचा एकूण अवैज लंपास करून पोबारा केला होता.

या प्रकरणी फिर्यादी महिला कमलबाई जोरवर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.१४-२०२१ भा.द.वि.कलम ३९४,३९७,४५७,३४ प्रमाणे अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत होते.त्यांनी या प्रकरणी तपासाची सूत्रे फिरवून आरोपी सचिन उर्फ संजय उर्फ बोग्या सखाहारी चव्हाण (वय-२८) रा.पढेगाव ता.कोपरगाव,सचिन विरुपन भोसले,(वय-२१),रा.गाजगाव ता.गंगापूर,या दोघाना अटक केली होती तर तिसरा आरोपी संकेत मेहंद्या उर्फ महेंद्र चव्हाण रा.शिर्डी हा मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाला होता.

दरम्यान या गुंह्यातील मुद्देमालापैकी १६ तोळे ९०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व २५० ग्रॅम वजनाची चांदीची लगड ताब्यात मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले होते.सदर दागिने कोपरगाव येथील न्यायालयाचे आदेशाने नुकतेच पोलिसना निरीक्षक दौलतराव जाधव यांनी परत दिले आहे.पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close