जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील हे गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव जिल्हा परिषद गटात बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून आल्या नंतर आता प्रशासनाला जाग आली असून पोहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन बडदे यांनी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून त्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार १३८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १७५ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१७ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५३ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ७४ हजार ९३८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख ९९ हजार ७५२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.०८ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ७४६ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.२३ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडे असललेल्या पोहेगाव जिल्हा परिषद गटात वर्तमानात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.या भागातील रांजणगाव देशमुख,बहादरपूर,अंजनापूर,जवळके आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले आहे.त्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने सर्वात आधी याबाबत प्रकाशझोत टाकला होता. याबाबत विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या.दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने पोहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.नितीन बडदे यांचेशी सम्पर्क साधला असता त्यांनी या परिसरात रांजणगाव देशमुख,बहादरपूर,अंजनापूर,जवळके आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण असून त्यांची संख्या ६० ते ६५ असल्याचे नमूद केले आहे.त्यामुळे आमच्या प्रतिनिधीने केलेल्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे.दरम्यान गावात रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५११ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०५ रुग्ण बाधित आढळले असून ५०६ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५०४ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०१ तर अँटीजन तपासणीत ०५ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०४ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण १० रुग्ण बाधित आढळले आहे.तर ३३ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख २१ हजार ९४० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०६ हजार ५७५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख ०८ हजार ६५७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ७०७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण ग्रामीण भागात बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close