जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात जागतिक ओझोन दिन साजरा

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

के.जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ( IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक ओझोन दिन”मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार १९९५ सालापासून हा दिवस पाळला जातो.१९७८ साली कॅनडातल्या मॉन्ट्रिअल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणा-या दुष्परिणामांबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली.हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

कारण रसायनांतील बदलांसाठी २०१० आणि २०३० या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत.जागतिक ओझोन दिनानिमित्त कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

“पृथ्वीवरील ओझोन आवरण वाचवण्यासाठी तरुण विद्यार्थ्यानीं पुढे आले पाहिजे, स्थानिक पातळीवरील संसाधनांचा विवेकी वापर करून अतीआरामदायी जीवन पद्धतीचा त्याग करून आपल्या गरजांवर मर्यादा घातल्या पाहिजे त्याच बरोबर ओझोनचा ऱ्हास थांबवण्यासाठी तरुणाईने निसर्गपूरक जीवनशैली स्वीकारावी ” असे आवाहन त्यांनी प्रा .चेतराज शर्मा यांनी केले. प्रा, शर्मा हे नरबहादूर भंडारी शासकीय महाविद्यालय, गंगटोक सिक्कीम येथे कार्यरत आहेत.ते पुढे असे म्हणाले कि ” माता वसुंधरेच्या संरक्षणाची जबाबदारी तरुण विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे व ती जबाबदारी ते सक्षमपणे पेलवतील मात्र यासाठी “थिंक ग्लोबली बट ऍक्ट लोकली” असे धोरण स्वीकारले पाहिजे.

या व्याख्यानाला बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. या व्याख्यानांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे प्रास्तविक प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले. या कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय डॉ.वासुदेव साळुंके यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भूगोल विभागाचे प्रमुख डॉ.गणेश चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विजय ठाणगे, डॉ.संतोष पगारे, कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे व भूगोल विभागाचे प्रा.आकाश सोनवणे, प्रा.लीना त्रिभुवन,प्रा.कुणाल शिंदे यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close