जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्थावर मालमत्तेची नोंदणी करा अन्यथा दंडात्मक कारवाई-वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेची नोंदणी केली नसेल त्यांना तातडीने आपल्या मालमत्तेची नोंदणी करण्यास अधिकाऱ्यांनी भाग पाडावे अन्यथा अधिकाऱ्यांवर व मालत्ताधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज एका बैठकीत अधिकाऱ्यांना दिला आहे.

काही कर्मचाऱ्यांनी या पूर्वीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानां हाताशी असे गैरप्रकार खपवून नेले आहे.तर काही माजी पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे हात ओले करून पालिकेचे नुकसान केले आहे.त्यातून पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या नंतर अशांची गय केली जाणार नाही. व नागरिकांनी आपला कर भरणा केल्यावर रीतसर पावती घेणे आवश्यक असल्याचेही बजावले आहे.व नागरिकांनी आपल्या मालमत्तेची रीतसर नोंदणी करून घ्यावी ते आपल्या हिताचे असून त्याची गंभीर दखल घ्यावी-अध्यक्ष विजय वहाडणे

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत अनेक मालत्ताधारकांनी नगरपरिषदेचे कर चुकविण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपल्या घर,बंगला,व्यावसायीक गाळे,मोठी इमारत आदींची नोंदच नगरपरिषदेच्या दप्तरी केलेली नाही अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे.याची गंभीर दखल नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यानीं घेतली आहे व त्यासाठी आज सकाळी त्यांच्या कार्यालयात त्यासाठी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते.त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,करनिरीक्षक पल्लवी सूर्यवंशी,कार्यालयीन अधीक्षक श्वेता शिंदे,आदी मान्यवर उपास्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,कोपरगाव पालिकेचा महसूल लोकसंख्येच्या मानाने कमी असल्याचे आढळून आले आहे.त्याच्या कारणांचा शोध घेतला असता हिबाब उघड झाली आहे.विशेष म्हणजे या प्रकरणात काही नगरपरिषदेचे कर्मचारीही मालमत्ता कर बुडविण्यास सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे यावर कठोर कारवाई करने करणे क्रमप्राप्त झाले आहे.नगरपरिषदेत काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक घोटाळे केल्याचे नुकतेच उघड झाले आहे.त्यातून हा प्रकार उघड झाल्याचेही मानले जात आहे.यातुन एक कारकून नुकतेच मुख्याधिकारी यांनी बडतर्फ केल्याची घटना ताजी आहे.त्यामुळे वरिष्ठ लोकप्रतिनिधी व अधिकारी सतर्क झाले असून या बाबत नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.काही कर्मचाऱ्यांनी या पूर्वीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानां हाताशी असे गैरप्रकार खपवून नेले आहे.तर काही माजी पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे हात ओले करून पालिकेचे नुकसान केले आहे.त्यातून पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या नंतर अशांची गय केली जाणार नाही. व नागरिकांनी आपला कर भरणा केल्यावर रीतसर पावती घेणे आवश्यक असल्याचेही बजावले आहे.व नागरिकांनी आपल्या मालमत्तेची रीतसर नोंदणी करून घ्यावी ते आपल्या हिताचे असून त्याची गंभीर दखल घ्यावी नंतर होणाऱ्या दंडास व होणाऱ्या कारवाईस पालिका जबाबदार राहणार नाही असे बजावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close