जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहर विकासाला सर्वांच्या मदतीची गरज-वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या विकासाला सर्वच पक्षाच्या नेत्यांची गरज असून आपण यापूर्वीही सध्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली असून कोपरगावचे नवोदित आमदार आशुतोष काळे यांचीही आपण मदत घेणार असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी पालिकेत एका बैठकीत केले आहे.

त्यावेळी पालिका हद्दीतील सर्व मालमत्ता नोंदीचा विषय क्रं. चार मध्ये आला असता चुकीच्या नोंदी करून पालिकेचे नुकसान करणाऱ्या काही बडतर्फ कर्मचाऱ्यांचा समाचार घेतांना,”काहींनी चुकीच्या नोंदी करून काहींनी हॉटेलची बिले भरल्याचा आरोप केला त्यांच्या चौकशा करून त्यांच्याकडून दंडात्मक वसुली करावी करावी-उपनगराध्यक्ष योगेश बागुल

कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी राज्याचे नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी सर्व विषय समित्यांचे सभापती,सर्वपक्षीय नगरसेवक,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

कोपरगाव पालिका हद्दीत प्लास्टिक बंदी ठराव होऊनही त्यांची अंमलबजावणी झालीच नसल्याकड़े सेनेच्या नगरसेविका सपना मोरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.त्याला दुजोरा देत राष्ट्रवाडीचें गटनेते विरेन बोरावके यांनी आता या बंदीला न जुमाणनाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा देण्याचे सोपस्कार करण्यास विरोध करून थेट कारवाई करण्याची मागणी केली.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,कोपरगाव शहरातील अनेक कामे प्रलंबीत आहे ती वेगाने मार्गी लावणे गरजेचे आहे.त्यामुळेच आपण या पूर्वीच त्यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली आहे.ते शहर विकासाला नक्कीच मदत करतील.त्याचप्रमाणे आपण कोपरगावचे नवोदित आमदार आशुतोष काळे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला असून विकास कामाबाबत चर्चा केली आहे.निवडणुका आता संपल्या आहेत.त्यामुळे आता कार्यकर्त्यानीं त्यातून आता बाहेर आले पाहिजे व शहर हे कोणा एका व्यक्तीचे नसून ते सर्वांचे आहे.याचे भान ठेवून विकासकाची भूमिका घेतली पाहिजे.सुडाचा राजकारण प्रवास कोणाच्याच हिताचा नसतो.हे आत्ताच झालेल्या युत्या-आघाड्यांवरून समजून घेतले पाहिजे.राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे.कोपरगाव शहर हे आपला परिवार असून आपण त्याचे सर्व सदस्य असून कोणी कोणत्याही पक्षाचे काम करा मात्र शहर विकासाला एकत्र या.वैयक्तिक संबंध बिघडू देऊ नका.तरच शहराचे कल्याण होईल.त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळेल.प्रारंभी त्यांनी आपल्या शैलीत राज्यातील वर्तमान राजकीय नाट्यावर व चालू घडामोडीवर चारोळ्या ऐकवतांना,

“जनतेला कळत नाही, कोण कोणत्या पक्षात,”

नेते पत्नीला विचारतात,आम्ही कोणत्या पक्षात ?”

असे म्हणून उपस्थितांची करमणूक करून वातावरण हलकेफुलके केले.त्यावेळी अनेकांना हसू आवरले नाही.

यावेळी आ. आशुतोष काळे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यासाठी राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांनी अध्यक्ष वहाडणे यांचेकडे बैठकी आधी पत्र देऊन मागणी केली तर अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अभिनंदन ठरावानंतर आ. काळे यांच्या अभिनंदन ठरावास दुजोरा दिला त्याला सर्वच नगरसेवकांनी संमती देऊन दोन्ही नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वसंमतीने संमत केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close