कोपरगाव तालुका
गोदावरीच्या पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत द्या-शेतकऱ्यांची मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातून पूर्ववाहिनी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीसह तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे महसूल विभागाने केले आहे.मात्र अद्याप या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही ती त्वरित मिळावी अशी मागणी तेथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे आज सकाळी आकाराच्या सुमारास एक निवेदन देऊन केली आहे.
कोपरगाव सह राज्यात या वर्षी सातत्याने पाऊस होऊन गोदावरीला पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आले होते.हा पूर बरेच दिवस टिकून होता जवळपास 125 टि. एम.सी.पाणी गोदावरी नदीतून जायकवाडी धरणाकडे वाहून गेले.मात्र नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले .या बाबत महसूल विभागाने पंचनामे केले आहे मात्र या बाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा पहिला हप्ता मंजूर झाला असताना या नदीकाठच्या बाधित शेतकऱ्यांना मात्र न्याय मिळालेला नाही .तरी महसूल विभागाने या शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा अशी मागणी मच्छीन्द्र पुंगळ,भागवत गुरसळ,बाळासाहेब गुरसळ,संदीप गुरसळ, आदींनी केली आहे.