जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दोन गुंह्यातील तीन आरोपी कोपरगाव तालुका पोलिसांकडून जेरबंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव व चासनळी या दोन विविध गुंह्यातील आरोपी सचिन मेहेरखांब व निलेश मेहेरखांब तसेच बक्तरपुर रस्ता लुटीतील एक आरोपी पप्पू उर्फ प्रल्हाद बाळासाहेब कापसे या तिघांना कोपरगाव तालुका पोलिसांनी नुकतेच पहाटेच्या सुमारास धाड टाकून जेरबंद केले आहे.पोलिसांच्या या धाडसाबद्द्ल सर्वत्र कौतुक होत आहे.

सुरेगाव ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजनेची एक विहीर असून या विहिरीवर गावाला पाणी पुरवठा करणारी एक विद्युत मोटार होती सदर मोटारीवर चोरांची वक्रदृष्टी पडली होती.व 30 एप्रिल 2018 रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यानीं ती लंपास केली होती या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 30 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कर्मचारी समाधान निकम यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (क्रं.-58/2018 ) दाखल केला होता.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, सुरेगाव ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजनेची एक विहीर असून या विहिरीवर गावाला पाणी पुरवठा करणारी एक विद्युत मोटार होती सदर मोटारीवर चोरांची वक्रदृष्टी पडली होती.व 30 एप्रिल 2018 रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यानीं ती लंपास केली होती या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 30 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कर्मचारी समाधान निकम यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (क्रं.-58/2018 ) दाखल केला होता.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी तपास केला असता त्यांना त्याच गावातील आरोपी असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते त्यांनी य याप्रकरणी पाठपुरावा केला असता त्यात त्याच गावातील आरोपी सचिन मेहेरखांब व निलेश मेहेरखांब हे दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते.तो पासून पोलीस त्यांच्या मागावर होते.पोलिसानी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरी छापा टाकला असता ते तेथेच मिळून आल्याने त्या दोघाना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या तर दुसरा गुन्हा चास नळी ग्रामपंचायत हद्दीत घडला होता.

कोपरगाव शहरातील इंदिरानगर या उपनगरातील बकरीचा व्यापारी मुसा खाटीक यांना आपल्या बकऱ्या विकून आपल्या दुचाकीवरून पुन्हा घराकडे जात असताना आरोपी पप्पू उर्फ प्रल्हाद बाळासाहेब कापसे व त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांनी त्यांना बक्तरपूर ग्रामपंचायत हद्दीतील कमानीजवळ त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता.तो पासून कोपरगाव तालुका पोलीस त्यांच्या मागावर होते.

(गु.क्रं.142/2018 )त्यात कोपरगाव शहरातील इंदिरानगर या उपनगरातील बकरीचा व्यापारी मुसा खाटीक यांना आपल्या बकऱ्या विकून आपल्या दुचाकीवरून पुन्हा घराकडे जात असताना आरोपी पप्पू उर्फ प्रल्हाद बाळासाहेब कापसे व त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांनी त्यांना बक्तरपूर ग्रामपंचायत हद्दीतील कमानीजवळ त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता.तो पासून कोपरगाव तालुका पोलीस त्यांच्या मागावर होते.गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या खबरीनुसार पोलिसांना तो आपल्या घरी आला असल्याची पक्की खबर मिळाली होती पोलिसांनी पहाटेच्या सुमारास त्याच्या घरी धाड टाकली असता तो तेथे मिळून आला त्याला

पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.या कामी पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका निभावली होती.त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close